मुंबईत काल रात्री रंगलेल्या वोग वुमन आॅफ द ईअर अवार्डच्या रंगीबेरंगी सोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी रंग भरले. यादरम्यान रेड कार्पेटवर उतरलेल्या बॉलिवूड नट्यांवर सगळ्यांच्या नजरा खिळल्या. करिना कपूरपासून राधिका आपटेपर्यंत अनेकींनी या सोहळ्याला ग्लॅमरस अंदाजात हजेरी लावली.
करिना कपूर कायम लाईटलाईटमध्ये असते़ प्रत्येक पार्टी आणि प्रत्येक पुरस्कार सोहळ्याची शान असलेल्या करिना याही सोहळ्यात हॉट अंदाजात या सोहळ्यात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
जान्हवी कपूरही बोल्ड अंदाजात रेड कार्पेटवर उतरली़ तिने ईशान खट्टरसोबत पोज दिली.