Join us

आलिया भट्टला मिळाले जुळे भाऊ-बहीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 16:37 IST

बॉलिवूडसाठी रविवारचा दिवस खºया अर्थाने स्पेशल राहिला आहे. इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रेटींचा चाहता दिग्दर्शक करण जोहर हा जुळ्या मुलांचा बाप ...

बॉलिवूडसाठी रविवारचा दिवस खºया अर्थाने स्पेशल राहिला आहे. इंडस्ट्रीमधील अनेक सेलिब्रेटींचा चाहता दिग्दर्शक करण जोहर हा जुळ्या मुलांचा बाप बनला असून, करणला वडील मानणाºया अभिनेत्री आलिया भट्टलाही भाऊ-बहीण मिळाले आहेत. करणने याबाबतची घोषणा करताच त्याच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव होत आहे. करणने ही गुड न्यूज शेअर करताच त्याला आलियाने ट्विट करून शुभेच्छा दिल्या. आलियाने ट्विटमध्ये म्हटले की, ‘आता मी म्हणू शकते की, मलाही लहान भाऊ-बहीण आहेत.’ आलियाने ट्विट करताच ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’मधील तिचा हिरो वरुण धवननेही लागलीच ट्विट करून करणला शुभेच्छा दिल्या. त्याने लिहले की, मला खात्री आहे की, तू या जगातला सर्वोत्तम वडील म्हणून भूमिका पार पाडशील. }}}} दिग्दर्शक फराह खाननेदेखील करणला शुभेच्छा देताना म्हटले की, ‘एक गोष्ट चांगली झाली की, तू माझा सल्ला ऐकलास’ या व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख, सुशांत सिंह राजपूत यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी करणला शुभेच्छा दिल्या. }}}} करण जोहरने रविवारी सकाळीच तो सरोगसी पद्धतीने जुळ्या मुलांचा बाप झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर माध्यमांसह सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली असून, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. इंडस्ट्रीमधील अनेक नामांकित सेलिब्रेटींनी त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये रविवारचा दिवस खूपच स्पेशल राहिला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. 

Glad u took my advice seriously @karanjohar Best thing to happen to you.. n theyll b the youngest people you hang out with so all's good