Join us

आलिया भट्ट-गौरी शिंदे सेटवर एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 11:28 IST

अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. या चित्रपटाचा शाहरूख ...

अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम दिग्दर्शक गौरी शिंदे यांच्या चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. या चित्रपटाचा शाहरूख खान हा महत्त्वाचा भाग आहे. आलिया चार अभिनेत्यांसोबत या चित्रपटात दिसणार आहे.हे चार अभिनेते म्हणजे अली जफर, कुणाल कपूर, अंगद बेदी आणि आदित्य रॉय कपूर यांच्यासोबत रोमान्स करतांना ती दिसेल. काल रात्री चित्रपटाच्या सेटवर आलिया आणि गौरी शूटिंगसाठी बिझी होत्या.सध्या तिचे शेड्यूल खुपच पॅक असून गौरीने अद्याप चित्रपटाचे नाव निश्चित केलेले नाही. शाहरूख-आलिया या चित्रपटांत असल्याने चित्रपटाविषयी जास्तच उत्सुकता त्यांच्या फॅन्समध्ये आहे.