Join us

अखेर Alia Bhattची डिलिव्हरी डेट आली समोर, बहिणीच्या वाढदिवसाच्या दिवशी होऊ शकते आई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 16:23 IST

आलिया भट सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपासून ते पर्सनल लाईफमुळे चर्चेत होती. लवकरच ती आई होणार आहे.

आलिया भट (Alia Bhatt) सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपासून ते पर्सनल लाईफमुळे चर्चेत होती. लवकरच अभिनेत्री तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. आलिया नोव्हेंबरमध्ये आई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या डिलिव्हरीच्या तारखेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, मात्र एका रिपोर्टनुसार आलियाची डिलिव्हरी (Alia Bhatt delivery)बाळाला २० ते ३० नोव्हेंबर दरम्यान होऊ शकते. विशेष म्हणजे याच दरम्यान आलियाची बहीण शाहीन भट(Shaheen Bhatt) चाही वाढदिवस आहे.

आलिया भट्ट नोव्हेंबर महिन्यात बाळाला जन्म देऊ शकते. रिपोर्टनुसार, आलिया 20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान आपल्या बाळाला जन्म  देऊ शकते. असे म्हटले जाते की आलियाची डिलिव्हरीची डेट बहीण शाहीनच्या वाढदिवसाच्या आसपास असू शकते, जो 28 नोव्हेंबर आहे. असे झाले तर आलियाच्या बहिणीसाठी आणि तिच्या कुटुंबासाठी यापेक्षा चांगले गिफ्ट असू शकत नाही. सध्या चाहते आलियाच्या बाळाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एच.एन. रिलायन्स हॉस्पिटलवर आलियाच्या  डिलिव्हरीसाठी बूक करण्यात आला आहे. सध्या अभिनेत्री चित्रपटांपासून दूर घरी आराम करत आहे आणि तिचा पती रणबीर कपूर देखील तिची काळजी घेतो आहे.

आलियाची बहीण शाहीन भट मावशी होण्यासाठी खूप उत्सुक आहे. याआधी न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत शाहीननेही मावशी होण्याबाबत आनंद व्यक्त केला होता. तिने खुलासा केला की संपूर्ण भट कुटुंब नवीन सदस्याला भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे. 

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरसेलिब्रिटी