Join us  

आलिया भट्टने रणबीर कपूर राहतो त्या बिल्डींगमध्ये खरेदी केलं घर? किंमत वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 12:31 PM

आता तर अशी बातमी समोर आली आहे की, आलियाने त्याच बिल्डींगमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केली आहे ज्यात रणबीर कपूर राहतो.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची जोडी आजकाल आपल्या सिनेमापेक्षा त्यांच्या अफेअरमुळे चर्चेत राहते. गेल्या काही काळापासून आलिया-रणबीरला कमिटेड रिलेशनशिपमध्ये मानले जात आहेत. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनदरम्यान दोघांना अनेकदा एकत्र बघण्यात आलं आहे. आता तर अशी बातमी समोर आली आहे की, आलियाने त्याच बिल्डींगमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केली आहे ज्यात रणबीर कपूर राहतो.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टने हे अपार्टमेंट ३२ कोटी रूपयांना खरेदी केलं आहे. आलियाचं हे नवं अपार्टमेंट २४६० स्क्वेअर फूटाचं आहे आणि पाचव्या मजल्यावर आहे. रणबीरचं घर याच अपार्टमेंटमध्ये ७व्या मजल्यावर आहे. एकूण १२ मजली ही इमारत कपूर फॅमिलीच्या कृष्णा राज बंगल्याच्या जवळच आहे. तशी आलिया सध्या बहीण शाहीन भट्टसोबत जुहूमध्ये राहते आणि आता ती लवकरच नव्या घरात शिफ्ट होणार असल्याचं समजतं. (बाबो! रणबीर आणि आलियाच्या 'ब्रम्हास्त्र'चं बजेट आउट ऑफ कंट्रोल, आकडा वाचून जाल चक्रावून)

आलियाच्या एका जवळच्या सूत्राने पिंकविलाला सांगितले की, आलियाने आपल्या अपार्टमेंटच्या इंटेरिअर डिझायनिंगचं काम शाहरूख खानची पत्नी गौरी खानला दिलं आहे. अशीही माहिती समोर आली आहे की, आलियाने आपल्या नव्या घरात हवन आणि लक्ष्मी पूजन केलं होतं. ज्यात परिवारातील लोकांसोबतच रणबीर कपूर, करण जोहर आणि अयान मुखर्जी उपस्थित होते. या घरासोबतच आलियाने याआधी जुहूमध्ये १३.११ कोटी रूपयाचं अपार्टमेंट खरेदी केलं होतं.

दरम्यान, आलिया आणि रणबीरचा 'ब्रम्हास्त्र' सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होऊ शकतो. तसेच या सिनेमाचं बजेट ३०० कोटींपेक्षा अधिक गेल्याचं नुकतंच मेकर्सनी सांगितलं. तसेच हा बॉलिवूडमधील सर्वात मोठा सिनेमा असल्याचं सांगितलं होतं. 

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरबॉलिवूड