Join us

'या' सिनेमाच्या शूटिंगसाठी आलिया भट्ट आणि वरुण धवन जाणार कारगिलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 15:27 IST

आलिया भट्ट आणि वरुण धवनची जोडीला सिल्वर स्क्रिनवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघांमधली केमिस्ट्रिला नेहमीच पसंती देण्यात आली आहे. तीन सिनेमा एकत्र दिल्यानंतर दोघे परत एकत्र दिसणार आहेत.  

ठळक मुद्देआलिया आणि वरुण करण जोहरच्या कलंकमध्ये एकत्र दिसणार आहेत लवकरच दोघे शूटिंगसाठी कारगिलला जाणार आहेत

आलिया भट्ट आणि वरुण धवनची जोडीला सिल्वर स्क्रिनवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघांमधली केमिस्ट्रिला नेहमीच पसंती देण्यात आली आहे. तीन सिनेमा एकत्र दिल्यानंतर दोघे परत एकत्र दिसणार आहेत.  

आलिया आणि वरुण करण जोहरच्या कलंकमध्ये एकत्र दिसणार हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते. सध्या दोघे कलंकच्या शूटिंग सुरु आहे लवकरच दोघे यासाठी कारगिलला जाणार आहेत. कारगिलमध्येच उरलेल्या सिनेमाची शूटिंग होणार आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार रविवारी आलिया आणि वरुण कारगिलला शूटिंगसाठी जाणार आहेत तर माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त त्यांना काही दिवसानंतर तिकडे ज्वाईन करणार आहेत.  हा एक पीरियड ड्रामावर आधारीत सिनेमा असून यात आलिया नव्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. या सिनेमासाठी ती कथ्थकचे प्रशिक्षण देखील घेते आहे. ती लवकरच माधुरी दीक्षितसोबत एका गाण्याचे चित्रीकरण करणार आहे. त्यात ती कथ्थक करताना दिसणार आहे. माधुरी व आलिया या दोघी एकत्र डान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट १९ एप्रिल, २०१९ला प्रदर्शित होणार आहे. २१ वर्षानंतर माधुरी दीक्षित व संजय दत्तला रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.  वरुण धवनबदल बोलायचे झाले तर त्यांने नुकतेच सलमान खानच्या भारत सिनेमाचे शूटिंग केले आहे. यात वरुणचा कॅमिओ रोल आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरने या सिनेमासाठी वरुणला अप्रोच केले होते. यात सलमान खान, कॅटरिना कैफ आणि दिशा पटानीची मुख्य भूमिका आहे.  

टॅग्स :आलिया भटवरूण धवन