Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचा क्युटेस्ट फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2017 12:39 IST

मागचे संपूर्ण वर्ष आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘तथाकथित’ रिलेशनशिपने गाजवले. ते दोघे प्रेमात आहेत की नाही? ते डेट ...

मागचे संपूर्ण वर्ष आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘तथाकथित’ रिलेशनशिपने गाजवले. ते दोघे प्रेमात आहेत की नाही? ते डेट करताहेत की त्यांचे ब्रेक-अप झाले, असे अनेक प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. परंतु ते दोघे नेहमीच एकत्र दिसतात.नुकतेच एका कार्यक्रमात हे दोघे एकत्रच सहभागी झाले होते आणि यावेळी काढलेला एक फोटो आतापर्यंतचा दोघांचा सोबतचा बेस्ट फोटो असेल. या फोटोमध्ये आलिया-सिद्धार्थ सोबत असून आलियाला एका लहान गोंडस मुलीने आलिंगन दिले असता तिच्या अशा या निरागस कृतीने आलिया व सिद्धार्थच्या चेहऱ्यावर फुललेले भाव पाहण्यासारखे आहेत.पहिल्या नजरेत तर हा फोटो परफेक्ट फॅमिली फोटोच वाटतो. ते दोघे एकमेकांना इतके पुरक आहेत की, एकत्र आल्यावर त्यांची केमिस्ट्री नेहमीच दिसून येते. एकाच चित्रपटातून पदार्पण केल्यापासून या दोघांच्या नावाची चर्चा आहे. परंतु त्यांनी कधीच स्वत:हून याविषयी काही घोषणा केली नाही. म्हणजे अफेयरच्या बातम्या नाकारल्याही नाही आणि मान्यदेखील केल्या नाही.                                                                                    Photo Source : aliabhattcafeमध्यंतरी दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले गेले. तिची मनधरणी करण्यासाठी सिद्धार्थच्या तिच्या घरी फेºया वाढल्या होत्या. सर्व काही व्यवस्थित झाल्यावर ते पुन्हा एकत्र दिसू लागले. त्यांनी यंदाचा न्यू इयर अ‍ॅमस्टरडॅम येथे साजरा केल्याची माहिती आहे. त्यापूर्वी ते बँकॉकला सुट्यांसाठी गेले होते.मागचे वर्ष आलियासाठी फारच चांगले राहिले. ‘उडता पंजाब’ आणि ‘डिअर जिंदगी’मधील तिच्या अभिनयाची खूप कौतुक करण्यात आले. या दोन्ही चित्रपटांतील भूमिकांसाठी तिला फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचे नामांकनही मिळाले आहे. सिद्धार्थसाठी २०१६ हे वर्ष मात्र ५०-५० राहिले. त्याचा ‘कपूर अँड सन्स’ला जरी यश मिळाले असले तरी ‘बार बार देखो’ सपाटून आपटला.