Join us

सडक 2मध्ये दिसणार आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राची जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 15:29 IST

सध्या 1991 साली आलेल्या सडक चित्रपटाच्या रिमेकची चर्चा आहे. ऐवढेच नाही तर पूजा भट्टनेसुद्धा काही दिवसांपूर्वीच रिमेकवर काम चालू ...

सध्या 1991 साली आलेल्या सडक चित्रपटाच्या रिमेकची चर्चा आहे. ऐवढेच नाही तर पूजा भट्टनेसुद्धा काही दिवसांपूर्वीच रिमेकवर काम चालू असल्याचे म्हटले होते. गेल्याच आठवड्यात संजय दत्त, महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांनी एकत्र भेटून स्क्रीनप्लेसंदर्भात चर्चा केली होती. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटात लीड रोलमध्ये पूजा भट्ट आणि संजय दत्त दिसणार आहेत. याशिवाय काही तरुण चेहऱ्यांना सुद्धा या चित्रपटात घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.  मिड-डे मध्ये आलेल्या रिपोर्टनुसार यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्टसुद्धा झळकणार आहेत. एका सूत्रांने मिड डेला सांगितले की,  आधी सिद्धार्थ आणि आलियाला मोहित सूरीचा आगामी चित्रपट आशिकी 3 मध्ये घेण्यात येणार होते मात्र आता तो चित्रपट बनत नाहीये त्यामुळे विशेष फिल्म्स आता दोघांमध्ये सडक 2 मध्ये कास्ट करण्याचा विचार करते आहे. मात्र या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे नाव अजून फायनल होणे बाकि आहे.  मिळालेल्या माहितीनुसार हा चित्रपट पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात रिलीज करण्यात येणार आहे. मात्र अजून या चित्रपटाच्या डेट्स फायनल झाल्या नाही आहेत. एका इंटरव्ह्रु दरम्यान महेश भट्टने सांगितले होते की, आधीच्या चित्रपट जे इमोशन्स लोकांनी बघितले होते तेच इमोशन्स याही चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगली होती. ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटाच्या सेटवर सिद्धार्थ व जॅक यांच्यातील क्लोजनेस वाढला. ही बातमी आलियाच्या कानावर गेली आणि तिने म्हणे  त्याचवेळी सिद्धार्थपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला, असे सांगितले गेले होते.   मात्र शाहरुखच्या बर्थ डे पार्टीत एकत्र येऊन त्यांनी सगळ्या चर्चांना पूर्ण विराम दिला. आलिया लवकरच आयन मुखर्जीच्या ब्रम्हास्त्र चित्रपटा झळकणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करतो आहे. यात पहिल्यांदाच आलियासोबत रणबीर कपूर दिसणार आहे. तसेच यात बिग बी अमिताभ बच्चन यांची महत्त्वाची भूमिका आहे. काही दिवसांपूर्वी आलियाने मेघना गुलजारच्या राजी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. ALSO READ :  ​शाहरूखच्या बर्थ डे पार्टीत दिसला अजब ‘इत्तेफाक’! सिद्धार्थ मल्होत्राचा टी-शर्ट आलिया भट्टच्या अंगावर!