Join us

आलिया भट व रणबीर कपूरचा एकत्र काम करण्यास नकार! हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2019 11:35 IST

आलिया भट आणि रणबीर कपूरची जोडी रिअल लाईफमध्ये जाम चर्चेत आहे. बॉलिवूडचे हे सुंदर कपल लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहेत. साहजिकच, या कपलची रिअल लाईफ केमिस्ट्री, रिल लाईफमध्ये कॅश करण्यास मेकर्स उत्सूक आहेत. पण ...

ठळक मुद्देआलिया अनेक चित्रपटात बिझी आहे. ‘ब्रह्मास्त्र’ शिवाय ‘कलंक’, ‘तख्त’,‘आरआरआर’, ‘इंशाअल्लाह’ असे अनेक चित्रपट तिच्याकडे आहेत.

आलिया भट आणि रणबीर कपूरची जोडी रिअल लाईफमध्ये जाम चर्चेत आहे. बॉलिवूडचे हे सुंदर कपल लवकरच लग्न करणार, असेही मानले जात आहेत. साहजिकच, या कपलची रिअल लाईफ केमिस्ट्री, रिल लाईफमध्ये कॅश करण्यास मेकर्स उत्सूक आहेत. त्यामुळेच तूर्तास आलिया व रणबीर या दोघांनाही एकत्र काम करण्याच्या अनेक आॅफर्स मिळत आहेत. मध्यंतरी ही जोडी लव रंजन यांच्या चित्रपटात दिसणार, अशीही खबर होती. पण आलियाने म्हणे, या चित्रपटास नकार दिला. या नकाराचे कारण काय, तर रणबीर व आलिया दोघांनाही तूर्तास तरी एकत्र काम करायचे नाही. का? तर त्यामागेही एक कारण आहे. 

होय, याचे कारण आहे, ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा. ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी सिनेमात आलिया व रणबीर एकत्र काम करताना दिसणार आहेत. हा चित्रपट पूर्ण झाल्याशिवाय दोघांनीही एकत्र प्रोजेक्ट साईन न करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्यापही ‘ब्रह्मास्त्र’चे १५० दिवसांचे शूटींग बाकी आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत तरी आलिया व रणबीरची जोडी पडद्यावर एकत्र दिसणे कठीण मानले जात आहे. तुम्हाला ठाऊक असेलच की, ‘ब्रह्मास्त्र’या चित्रपटाच्या सेटवरच आलिया व रणबीर एकमेकांच्या जवळ आलेत आणि त्यांच्या प्रेम फुलले. 

तूर्तास आलिया अनेक चित्रपटात बिझी आहे. ‘ब्रह्मास्त्र’ शिवाय ‘कलंक’, ‘तख्त’,‘आरआरआर’, ‘इंशाअल्लाह’ असे अनेक चित्रपट तिच्याकडे आहेत. आलियाचा ‘कलंक’ हा चित्रपट येत्या १९ तारखेला प्रदर्शित होतोय. यानंतर लगेच ती संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’चे शूटींग सुरु करतेय. यात ती सलमान खानच्या अपोझिट दिसणार आहे.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर