Join us

कन्फर्म या सिनेमात दिसणार आलिया आणि महेश भट्टची जोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 16:08 IST

आलिया भट्ट सध्या बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बी-टाऊनमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे.

ठळक मुद्दे आलिया महेश भट्ट यांच्या 'सडक 2' मध्ये दिसणार आहेपहिल्यांदा बाप-लेकीची जोडी सिनेमात दिसणार आहे

आलिया भट्ट सध्या बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बी-टाऊनमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. तिच्या राजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. लवकरच आलिया महेश भट्ट यांच्या 'सडक 2' मध्ये दिसणार आहे. या आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदा बाप-लेकीची जोडी सिनेमात दिसणार आहे. 

ताजा रिपोर्टनुसार आलिया भट्टची मोठी बहीण पूजा भट्टदेखील यात काम करणार आहे, मात्र ती यात अभिनय करणार नाही तर दिग्दर्शकाची भूमिका साकारणार आहे. रिपोर्टनुसार संजय दत्त यात रविची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची कथा पुन्हा एकदा संजय दत्तला समोर ठेवून लिहिली गेली असल्याचे बोलले जातेय. जो आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी आकाश-पाताळ एक करतो. 

 पूजा ‘सडक2’चे दिग्दर्शन मोहित सूरी करणार असल्याचे बोलले जात होते मात्र आता या सिनेमाचे दिग्दर्शन पूजा भट्ट करणार आहे.  १९९१ मध्ये ‘सडक’हा चित्रपट आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.  यातील चार्टबस्टर म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. यात पूजा भट्ट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात संजय दत्त एका वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असलेल्या  मुलीच्या प्रेमात पडतो आणि यानंतर दलालांपासून तिला वाचवतो, असे दाखवले गेले होते. हीच कथा पुढे नेत ‘सडक2’मध्ये संजय दत्त व त्याच्या मुलीची भूमिका दाखवली जात आहे. 

टॅग्स :आलिया भटमहेश भट