Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अल्फा'च्या माध्यमातून आलियाची 'स्पाय युनिव्हर्स'मध्ये एन्ट्री, 'मुंज्या' फेम अभिनेत्रीसोबत देशासाठी लढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 12:04 IST

शाहरुख-सलमानच्या जोडीने आलिया भट सुद्धा स्पाय युनिव्हर्सचा भाग झालीय. तिच्या आगामी सिनेमाची घोषणा झालीय (alia bhatt, alpha)

नुकतीच एक मोठी बातमी समोर आलीय. स्पाय युनिव्हर्समधील आणखी एका सिनेमाची घोषणा झालीय. यावेळी स्पाय युनिव्हर्समध्ये लेडी ऑफिसरची एन्ट्री होतेय. ती म्हणजे आलिया भट. यशराज फिल्मसने नुकतंच YRF स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या फीमेल लीड सिनेमाची घोषणा केलीय. या सिनेमात आलियासोबत 'मुंज्या' फेम अभिनेत्री शर्वरी वाघ झळकणार आहे. 'अल्फा' असं या सिनेमाचं नाव आहे.

आलिया - शर्वरी 'अल्फा'मध्ये सुपर एजंट

बॉलीवूडची सुपरस्टार आलिया भट्ट आदित्य चोप्राच्या YRF स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या फीमेल लीड सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासोबत 'मुंज्या' फेम अभिनेत्री शर्वरी वाघही आहे. YRF च्या आदित्य चोप्रा यांनी स्पाय युनिव्हर्समधील 'अल्फा गर्ल्स' म्हणून या दोघींच्या सिनेमाला प्रेझेंट केलंय. केवळ पुरुष नाही तर महिलाही अल्फा असू शकतात, असा एक वेगळा संदेश 'अल्फा'मधून देण्यात येणार आहे.

अल्फा स्पाय युनिव्हर्सला पुढे घेऊन जाणार

आदित्य चोप्रा त्यांच्या YRF स्पाय युनिव्हर्सच्या पहिल्या फीमेल लीड चित्रपटाला एक्शन स्पेक्टेकल बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत. ‘अल्फा’ च्या दिग्दर्शनाची धुरा शिव रावल यांच्या हाती आहे. शिव रावल यांनी ‘द रेल्वे मॅन’ या ब्लॉकबस्टर सीरिजचे दिग्दर्शन केले होते. 

स्पाय युनिव्हर्सच्या आधीच्या सर्व चित्रपटांनी म्हणजेच ‘एक था टायगर,’ ‘टायगर जिंदा है,’ ‘वॉर,’ ‘पठाण,’ ‘टायगर ३’ ब्लॉकबस्टर यश मिळवले. लवकरच वॉर २ सुद्धा भेटीला येणार आहे. त्यामुळे अल्फा सिनेमा या स्पाय युनिव्हर्सला सक्षमतेने पुढे घेऊन जाईल, असा सर्वांना विश्वास आहे. या सिनेमाच्या माध्यमातून आलिया-शर्वरी पहिल्यांदाच सिनेमात एकत्र काम करणार आहेत.

टॅग्स :आलिया भटआदित्य चोप्रा शाहरुख खानसलमान खान