Join us

११ वर्षांची असतानाच रणबीर कपूरच्या प्रेमात पडली आलिया भट्ट! स्वत: दिली कबुली!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 10:01 IST

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची अधिकृत घोषणा होणे, तेवढे बाकी आहे. अलीकडच्या काळात या नात्यावर शिक्कामोर्तब झाले. सध्या आलिया ज्याप्रमाणे रणबीरच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतेय, त्यावरून तर हे नाते बरेच पुढे गेल्याचे दिसतेय. आता तर आलियाही या नात्यावर बोलू लागली आहे.

ठळक मुद्दे लवकरच हे रिअल लाईफ कपल ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात  स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याची अधिकृत घोषणा होणे, तेवढे बाकी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या रिलेशनशिपची चर्चा सुरु होती. अलीकडच्या काळात या नात्यावर शिक्कामोर्तब झाले. सध्या आलिया ज्याप्रमाणे रणबीरच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतेय, त्यावरून तर हे नाते बरेच पुढे गेल्याचे दिसतेय. आता तर आलियाही या नात्यावर बोलू लागली आहे. नुकतेच आलियाने रणवीरसोबतच्या नात्याबद्दल मौन सोडत आपण सुरुवातीपासूनच त्याच्या प्रेमात असल्याचे म्हटले आहे.  एका ताज्या मुलाखतीत आलिया रणबीरबद्दल भरभरून बोलली. यावेळी अनुष्का शर्मा आणि तब्बू या दोघेही उपस्थित होत्या. या तिघींनाही त्यांच्या बॉलिवूड क्रशबद्दल प्रश्न विचारला गेला. या प्रश्नाला उत्तर देताना आलियाने रणबीरचे नाव घेतले.  

मी रणबीरला पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी ११ वर्षांची होते. तेव्हापासूनच मला तो आवडायला लागला होता. यानंतर तो ‘सावरियां’ चित्रपटात झळकला आणि मी अक्षरश: त्याच्या प्रेमात पडले,असे आलिया म्हणाली. आलियाच्या या उत्तरानंतर अनुष्काने तिची जरा मजा घेतली.

मग तू घराच्या भींतीवर रणबीरचे पोस्टरही लावून ठेवायची का? असे अनुष्काने विचारले. यावर आलिया खरोखरचं लाजली. घराच्या भींतीवर फोटो तर नाही लावलेत, पण मी त्याचे फोटो खूप वेळ पाहत राहायची, असे लाजत लाजत तिने सांगितले. आता इतके सांगितल्यावर तसे फार काही सांगायचे उरले नाही. आता केवळ हे कपल आपल्या रिलेशनशिपची अधिकृत घोषणा कधी करते, ते फक्त बघायचेय. लवकरच हे रिअल लाईफ कपल ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात  स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूर