Join us

आलिया भट्ट जाणार 6 महिन्यांच्या सुट्टीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 19:14 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया 6 महिने अभिनयापासून दूर राहणे पसंत करणार आहे. अयान मुखर्जीच्या ड्रैगन चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरु ...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया 6 महिने अभिनयापासून दूर राहणे पसंत करणार आहे. अयान मुखर्जीच्या ड्रैगन चित्रपटाचे शूटिंग सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे आलियाकडे बराच वेळ आहे. यावेळेत ते आपला अभिनय कौशल्य आणखीन समृद्ध कसे करता येईल हे यावर भर देणार आहे.    आलिया आपल्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होण्याआधी तिला अभिनेयातील बारकावे शिकून घ्यायचे आहेत. याशिवाय ती या सुट्टीत पियानो आणि कथकचे प्रशिक्षण देखील घेणार आहे. आलिया वाटते एक अभिनेत्रीला लागणारे सारे गुण तिच्यात असले पाहिजे यासाठी ती विशेष महेनत घेताना दिसते आहे. तिच्या मते तुम्ही पडद्यावर फक्त एखादी भूमिका साकारत नाही तर त्यामागे तुमचा एखादा विचार असतो. यासाठी ती वेगळ्या-वेगळ्या अनुभव घेणे गरजेच समजते. याव्यतिरिक्त आलियाला कुकिंग करायला ही आवडते. आलियाला घरी येण्याऱ्या पाहुण्यासाठी जेवण करायला ही शिकायचे आहे. जेवण करता येणे हे गरजेचे असल्याचे आलियाचे मत आहे. स्टुंडट ऑफ द इअर चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आलियाने आतापर्यंत विविध थाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. एक सशक्त अभिनेत्री म्हणून आलिया लहान वयात स्वत:ला सिद्ध केले आहे. आलियाने नुकताच तिचा 24वा वाढदिवस साजरा केला आहे.