Join us

Alia Bhat : 'सिनेमा हे पहिलं प्रेम पण...' लेकीच्या जन्मानंतर आलियाने घेतला महत्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 10:58 IST

आलिया भट आई झाल्यानंतर आता पुन्हा सक्रिय झाली आहे. ती तिच्या फिटनेसवर लक्ष देत आहे

Alia Bhat : बॉलिवुड अभिनेत्री आलिया भट नुकतीच आई झाली आहे. सध्या ती लेक राहा कपूरच्या (Raha Kapoor) देखभालीत व्यस्त आहे. मूल झाल्यानंतर आलियाचं काम कमी होणार का अशी चर्चा सुरु झाली. पण नुकतेच आलियाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. तिच्यासाठी मुलगी राहा प्राधान्य असणार आहे. पण सिनेमा हे तिचे पहिले प्रेम आहे. मग आलिया नक्की काय करणार हे तिने सांगितले आहे.

झी सिने अवॉर्ड्स लवकरच घोषित होणार आहेत. त्यानिमित्त आयोजित इव्हेंटमध्ये अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता वरुण धवन सहभागी झाले होते. यावेळी दोघांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकाराने आलियाला विचारले, 'अनेक अभिनेत्री मूल झाल्यानंतर आपोआप कमी काम करतात. तुझ्यासोबतही आता असंच होणार आहे का?'

या प्रश्नावर आलिया म्हणाली, 'नक्कीच माझ्यासाठी सध्या आयुष्यात 'राहा' हेच प्राधान्य आहे. मात्र सिनेमा, फिल्म करणं हे माझं पहिलं प्रेम आहे.तर मी त्यादृष्टीने नक्कीच प्रयत्न करेन. बहुदा आता जास्तीत जास्त फिल्म करण्यापेक्षा कमी पण चांगल्या फिल्म मी करेन. quality over quantity वर मी भर देईल.'

आलिया आई झाल्यानंतर आता पुन्हा सक्रिय झाली आहे. ती तिच्या फिटनेसवर लक्ष देत आहे. तसेच लवकरच आलिया झोया अख्तरच्या (Zoya Akhtar) एका सिनेमामध्ये दिसणार आहे. ज्यामध्ये कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये तीन मित्रांची कथा होती तसेच आता या सिनेमातून आघाडीच्या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत.

टॅग्स :आलिया भटसिनेमापरिवार