Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिहारीच्या मुद्यावरुन आलिया आणि नीतूमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 11:26 IST

'उडता पंजाब' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नीतू चंद्रानं आलिया भट्ट आणि दिग्दर्शक अभिषेक चौबेला खुलं पत्र लिहलं होतं. ...

'उडता पंजाब' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नीतू चंद्रानं आलिया भट्ट आणि दिग्दर्शक अभिषेक चौबेला खुलं पत्र लिहलं होतं. आलियाची सिनेमातील भूमिका बिहारची छबी खराब करणारी असल्याचं पत्र नीतूनं लिहलं होतं.. बिहारला बदनाम करणं बंद करा असं नीतूनं म्हटलं होतं. याचविषयी छेडलं असता आलियानंही नीतूला प्रत्युत्तर दिलंय. काही जण फक्त ट्रेलर पाहून अर्थ काढतात.. अशांनी काहीही बरळण्यापेक्षा गप्प राहणंच चांगलं असं वाटतं असं उत्तर आलियानं नीतूला दिलंय. ट्रेलरवरुन काहीही बोलणं आणि ट्रेलरमध्ये जे दाखवलं ते तसंच असेल असंही नाही. त्यामुळं नीतू आणि इतर साशंक लोकांनी आधी सिनेमा पाहावा आणि मग आपापल्या भावना व्यक्त कराव्यात उगाचच काहीही बडबड करु नये. कारण ट्रेलर हा फक्त एक टीझर असतो अशा शब्दांत आलियानं नीतूला सुनावलंय.