Join us

​ अली जफर उभारणार १४१ शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 17:03 IST

दोन वर्षांपूर्वी अभिनेता, गायक व कलाकार अली जाफर याने पाकिस्तानातील सर्वाधिक लोकप्रीय हस्तींमधील २० हस्तींना घेऊन  ‘उडेंगे हमारे आसमान ...

दोन वर्षांपूर्वी अभिनेता, गायक व कलाकार अली जाफर याने पाकिस्तानातील सर्वाधिक लोकप्रीय हस्तींमधील २० हस्तींना घेऊन  ‘उडेंगे हमारे आसमान में’ हा एक म्युझिक व्हिडिओ बनवला होता. ‘उडेंगे हमारे आसमान में’ हा व्हिडिओ तुफान गाजला होता. पेशावरमधील एका शाळेत झालेल्या नरसंहारातील मृतात्म्यांना या व्हिडिओद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली होती. या नरसंहारात १४१ विद्यार्थी मृत्यूमुखी पडले होते. या मुलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १४१ शाळा उघडण्याचे वचन अलीने दिले होते. हे वचन अली पूर्ण करणार आहे. समाजासाठी आदर्श उदाहरण म्हणतात ते यालाच..वेल डन अली...