Join us

आलिया ‘हेमलॉक सोसायटी’ हिंदी रिमेकमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 23:09 IST

श्रीजीत मुखर्जी यांची बंगाली डार्क कॉमेडी ‘हेमलॉक सोसायटी’ यावर हिंदी रिमेक बनणार असून त्यात आलिया भट्टला घ्यायचे दिग्दर्शकांनी ठरवले ...

श्रीजीत मुखर्जी यांची बंगाली डार्क कॉमेडी ‘हेमलॉक सोसायटी’ यावर हिंदी रिमेक बनणार असून त्यात आलिया भट्टला घ्यायचे दिग्दर्शकांनी ठरवले आहे. आलिया मुख्य भूमिकेत असणार आहे. श्रीजीत हिंदीमध्येही रिमेक बनवणार आहेत.ते म्हणतात,‘ माझे महेश भट्ट साहब यांच्याशी बोलणे झाले आहे. आलिया ही आमची परफेक्ट चॉईस असली पाहिजे. बंगाली चित्रपटात कोएल मलिक यांनी ही भूमिका केली आहे.’ हा चित्रपट एका मुलीच्या मानसिक कमजोरीवर आधारित आहे. यात तिला आत्महत्या करण्याचे ट्रेनिंग घ्यायचे असते. अशा एका व्यक्तीला ती शोधून काढते जो आत्महत्या करण्यासाठी शिष्य घडवत असतो. यातून होणाºया गमतीजमती प्रेक्षकांना हसवतीलच.आलिया सध्या गौरी शिंदे यांच्या चित्रपटात शाहरूख खान सोबत शूटींग करते आहे.