अली फजलचा फिटनेस मंत्रा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 19:49 IST
नाना पाटेकर, तापसी पन्नू, श्रेया सरन आदींची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या प्रकाश राज दिग्दर्शित ‘तडका’ चित्रपटात अभिनेता अली फजल सध्या ...
अली फजलचा फिटनेस मंत्रा...
नाना पाटेकर, तापसी पन्नू, श्रेया सरन आदींची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या प्रकाश राज दिग्दर्शित ‘तडका’ चित्रपटात अभिनेता अली फजल सध्या बिझी आहे. पण तरिही अली स्वत:च्या फिटनेसबाबत अतिशय जागृत आहे. ‘तडका’च्यस गोव्यातील शूटींग शेड्यूलदरम्यानही व्यायाम चुकायला नको,हे अलीने पक्के ठरवले आणि त्याने तसे केले देखील. अलीचा भाऊ हयात फजल हा एक राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू आहे. योगायोगाने अली गोव्यात असताना हयातही गोव्यात होता. मग काय, फिटनेस राखण्यात हयात अलीच्या चांगलाच कामी आला. हयातने अलीला एखाद्या खेळाडूप्रमाणे ट्रेनिंग दिले. गोव्यातील महिनाभराच्या काळात अलीला अगदी काटेकोरपणे व्यायाम व आहाराची पथ्ये पाळावी लागली. ८ किमी धावणे, किक बॉक्सिंग सारखे वर्कआऊट त्याने अलीकडून करवून घेतले. आता तर स्वत: अली फिटनेसचे महत्त्व सांगताना जराही थकत नाही. शूटींगमध्ये असो-नसो वेळ मिळेल तेव्हा न चुकवता व्यायाम करणे अली करतोच करतो..