Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलियाने फस्त केले चक्क १५ सॅण्डविच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:31 IST

सु परस्टार शाहरूख खानचे जगात लाखो फॅन्स आहेत, यापैकीच एक आहे आलिया भट्ट. लहानपणापासूनच आलिया शाहरूखची जबरदस्त फॅन आहे. ...

सु परस्टार शाहरूख खानचे जगात लाखो फॅन्स आहेत, यापैकीच एक आहे आलिया भट्ट. लहानपणापासूनच आलिया शाहरूखची जबरदस्त फॅन आहे. जेव्हा तीने पहिल्यांदा या बादशहाला पाहिले होते तेव्हा ती त्याला पाहतच राहिली आणि तिने एक नाही, दोन नाही तर तब्बल पंधरा सॅण्डवीच खाल्ले. काही वर्षांपूर्वी महेश भट्ट यांच्याकडे पाकिस्तानहुन काही नातेवाईक आले होते. त्यांना शाहरूखला भेटायचे होते. महेश भट्ट यावेळी पाहुण्यांसोबत लहानग्या आलियाला घेऊन शाहरूखच्या घरी गेले. यावेळी शाहरूखला पहिल्यांदा पाहिल्यानंतर आलिया त्याला एकटक पाहतच राहिली आणि दस्तुरखुद्द शाहरूखने ऑफर केलेल्या प्लेट मधले १५ सॅण्डवीच कधी फस्त झाले हे तिला समजले पण नाही. शाहरूखबाबत बोलताना आलिया म्हणते, 'शाहरूख त्याच्या चाहत्यांशी खूप चांगल्याप्रकारे बोलतो. त्याचे पाय नेहमी जमिनीवर असतात. तो समोरच्या व्यक्तीला स्पेशल ट्रीटमेंट देतो.'