Join us

​बॉलीवूड अ‍ॅक्ट्रेसची ही बहीण बनणार अक्षयची हिरोईन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 20:52 IST

'यंगिस्तान' आणि 'क्या सुपरकूल है हम' सिनेमांत काम केलेली अभिनेत्री नेहा शमार्ची बहीण आता बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. मॉडेल ...

'यंगिस्तान' आणि 'क्या सुपरकूल है हम' सिनेमांत काम केलेली अभिनेत्री नेहा शमार्ची बहीण आता बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. मॉडेल आणि किंगफिशर कॅलेंडर गर्ल होती. आयशा शर्मा बॉलीवूड डेब्यू निमार्ता-दिग्दर्शक विपुल अमृतलाल शाहच्या 'नमस्ते इंग्लंड' सिनेमातून करणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार असेल.सिनेमात आयशा बनणार अक्षयची गर्लफ्रेंड...'नमस्ते इंग्लंड' सिनेमात सोनाक्षी सिन्हासुध्दा असेल. ती अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. आयशा शर्मा सिनेमात त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. सिनेमाचे शूटिंग यावर्षी आॅगस्टमध्ये सुरु होऊ शकते. २०१७ मध्ये सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमाचे शूटिंग लंडन, पंजाब आणि मुंबईमध्ये होणार आहे. अपेक्षा आहे, की प्रेक्षकांना अक्षय आणि आयशाची केमिस्ट्री आवडेल.'नमस्ते लंडन'शी मिळती-जुळती आहे कथा...'नमस्ते इंग्लंड'ची कथा 'नमस्ते लंडन'शी मिळती-जुळती आहे. त्या सिनेमात कतरिना कैफ अक्षयसोबतच आणखी एका परदेशी तरुणासोबत रोमान्स करताना दिसली होती. तसेच अक्षयसुध्दा या सिनेमात दोन हीरोईन्ससोबत रोमान्स करताना दिसणार आहे. एक असेल घरवाली अर्थातच सोनाक्षी आणि दुसरी बाहरवाली अर्थात आयशा.