Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयने करून घेतले स्वत:लाच जखमी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2016 11:54 IST

हा ‘जॉली एलएलबी २’ चा भाग असून चाहत्यांनी घाबरून जाऊ नये. मी एकदम फिट अ‍ॅण्ड फाईन आहे. थँक यू फॉर आॅल द लव्ह अ‍ॅण्ड कन्सर्न.’

 अक्षय कुमार आणि हुमा कुरैशी हे सध्या लखनऊ येथे ‘जॉली एलएलबी २’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. नुकतेच अक्षय कुमारच्या ‘रूस्तम’ चित्रपटाने बॉक्स आॅफीसवर चांगलीच कमाई केलेली असूनही लगेचच खिलाडीने दुसऱ्या  चित्रपटाची शूटींग सुरू केली आहे. त्याने दोन दिवसांपूर्वी लखनऊच्या स्टेशनवर हुमासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.सेटवरून नुकतेच कळते आहे की,‘अक्षयने स्वत:लाच जखमी करून घेतले आहे. वेल, पण यात घाबरून जाण्यासारखे काहीच नाही. कारण हा ‘जॉली एलएलबी २’ चा भाग असून चाहत्यांनी घाबरून जाऊ नये.मी एकदम फिट अ‍ॅण्ड फाईन आहे. थँक यू फॉर आॅल द लव्ह अ‍ॅण्ड कन्सर्न.’ असे तो सांगतो. तसेच त्याने एक व्हिडीओ पाठवला आहे ज्यात तो बॉक्सिंग करतांना दिसतो आहे. ‘थँक यू! मैं बिल्कुल ठीक हूँ.’