अक्षय कुमारने शहिदांच्या परिवाराच्या मदतीसाठी शेअर केली 'अॅप' आयडिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 09:46 IST
भारतीय सैनिकांप्रती नेहमीच मदतीच्या भावनेतून पुढाकार घेणाºया अभिनेता अक्षय कुमारने २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शहिद सैनिकांच्या कुटुंबासाठी एक आयडिया शेअर केली आहे. आपले कर्तव्य बजाविताना सीमेवर शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना सढळ हाताने मदत करता यावी यासाठी एक वेबसाइट किंवा अॅप काढण्याची कल्पना त्याने नेटिझनशी शेअर करीत त्यांच्या सूचना मागविल्या आहेत.
अक्षय कुमारने शहिदांच्या परिवाराच्या मदतीसाठी शेअर केली 'अॅप' आयडिया
भारतीय सैनिकांप्रती नेहमीच मदतीच्या भावनेतून पुढाकार घेणाºया अभिनेता अक्षय कुमारने २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून शहिद सैनिकांच्या कुटुंबासाठी एक आयडिया शेअर केली आहे. आपले कर्तव्य बजाविताना सीमेवर शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना सढळ हाताने मदत करता यावी यासाठी एक वेबसाइट किंवा अॅप काढण्याची कल्पना त्याने नेटिझनशी शेअर करीत त्यांच्या सूचना मागविल्या आहेत. अक्षय कुमारने फेसबुकवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याने लोकांना अतिशय भावनिक आवाहन केले आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच त्याने महिलांच्या सुरक्षेचा आणि त्यांचा आदर करण्याविषयीचा उल्लेख केला. तसेच मला जे योग्य वाटते ते मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करीत असतो. यातून काय घ्यायचे हे ज्याने-त्याने ठरवावे असे तो म्हणाला. बºयाचदा असेही होते की, चित्रपटांमध्ये मुलींच्या गळ्यात गळे घालून नाचणारा आपल्याला काय नैतिकता शिकवितो, असा प्रश्न माझ्याविषयी काही लोक उपस्थित करीत असतील. अशा लोकांना मला एकच सांगावेसे वाटते की, ते माझे प्रोफेशन असून, अतिशय जबाबदारी आणि प्रामाणिकपणे मी ते पार पाडत आहे. त्यामुळे माझ्या सांगण्याचा कोणी काय अर्थ घ्यावा हे ज्यानी-त्यानी ठरवावे, असेही तो म्हणाला. पुढे बोलताना तो म्हणाला की, आता माझ्या मनात असाच एक विचार आला आहे. आज २४ जानेवारी आहे, दोन दिवसांनंतर २६ जानेवारी असून, सबंध भारतीयांसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. यानिमित्त आपण आपल्या सैनिकांप्रती काही तरी करावे असा विचार माझ्या मनात आला आहे. कर्तव्य बजावताना आपले काही सैनिक शहीद होतात, सरकारकडून त्यांना मदत म्हणून अनुदान दिले जाते. ही चांगली गोष्ट आहे, परंतु त्यांच्या परिवाराकरिता ही मदत फारच किरकोळ स्वरूपाची असते. त्याचबरोबर आपल्यातील बºयाचशा लोकांना शहीद सैनिकांच्या परिवाराला मदत करावीशी वाटते, परंतु ती कुठे करावी, त्यांचे पत्ते काय? याविषयी माहिती नसल्याने आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मी एक पब्लिक फिगर असल्याने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतो. बºयाचशा जवनांना मी मदतही केली आहे; मात्र ज्यांना मदत करायची असते, अशा लोकांना थेट त्या शहीद सैनिकाच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी एखादी वेबसाइट किंवा अॅप तयार केला जावा, असे मला वाटते. या अॅपवर त्या सैनिकाच्या कुटुंबीयातील एका जबाबदार व्यक्तीचा अकाउंट नंबर दिला जावा, त्याचबरोबर त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही तिथे नमूद केलेली असावी. जेणेकरून त्या सैनिकावर किती लोक अवलंबून होते हे स्पष्ट होईल. ज्या व्यक्तीला या सैनिकाच्या कुटुंबाला मदत करायची आहे, त्याने थेट त्या कुटुंबाशी जोडून त्याच्या परिवाराला मदत करावी. त्या अकाउंटवर १५ लाख रुपये मदत म्हणून जमा झाल्यानंतर लगेचच ते अकाउंट वेबसाइटवरून कायमचे काढले जावे. आता तुम्ही विचार करीत असाल की, एवढी रक्कम कशी जमा होईल? मी तुम्हाला सोप्या भाषेत समजावून सांगतो. आपल्या देशाची लोकसंख्या १२५ कोटींपेक्षा अधिक आहे. त्यातील १५ हजार लोकांनी शंभर रुपये जरी या खात्यात जमा केले तरी, चार तासात त्या शहीद सैनिकाच्या कुटुंबाला १५ लाख रुपयांची मदत मिळेल. भारतात एखादा रॉक बॅण्ड आला तर लाखो लोक हजारो रुपये तिकीट खरेदी करून त्याठिकाणी हजेरी लावतात. मग शंभर रुपये त्या जवानाला मदत म्हणून देण्यास काय अडचण आहे. मला तुमच्या सूचना हव्या आहेत, तुम्ही मला पाठिंबा दिल्यास सरकारच्या मदतीने मीच अशाप्रकारची वेबसाइट किंवा अॅप लॉँच करणार असल्याचेही अक्षय म्हणाला. जरा विचार करावा आपला सैनिक सीमेवर दिवस-रात्र पहारा देत आहे, अशात एखादा सैनिक शहीद झाल्यास त्याच्या कुटुंबीयाचे काय? असा भावनिक प्रश्नही त्याने उपस्थित केला. तसेच तुम्ही मला पाठिंबा दिल्यास मी अशाप्रकारची वेबसाइट नक्की लॉँच करेल असा विश्वासही त्याने व्यक्त केला. अखेरीस ‘जय हिंद’ म्हणत त्याने आपल्या सूचनांना पूर्णविराम दिला.