पत्नीला ‘योद्धा’ का म्हणाला अक्षय कुमार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 13:33 IST
अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची बोल्ड अॅण्ड ब्युटिफुल पत्नी ट्विंकल खन्ना म्हणजे, बॉलिवूडचे एक आदर्श जोडपे. अलीकडे एका इव्हेंटमध्ये अक्षय ...
पत्नीला ‘योद्धा’ का म्हणाला अक्षय कुमार?
अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची बोल्ड अॅण्ड ब्युटिफुल पत्नी ट्विंकल खन्ना म्हणजे, बॉलिवूडचे एक आदर्श जोडपे. अलीकडे एका इव्हेंटमध्ये अक्षय ट्विंकलची तोंडभरून प्रशंसा करताना दिसला.ट्विंकल माझ्या घराची ‘योद्धा’ आहे, हे सांगण्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही. ज्याच्या हातात बंदूक तोच केवळ योद्धा नाही. माझ्या मते, जी व्यक्ती स्वत:चे घर आणि जवळच्या लोकांना एकत्र बांधून ठेवते, ती सुद्धा योद्धाच असते. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती योद्धाचं असते, असे अक्षय यावेळी म्हणाला. अक्षयच्या या बोलण्यातून काय झळकते, तर पत्नीबद्दलचा आदर आणि सन्मान. अक्षय या इव्हेंटमध्ये आणखीही बराच काही बोलला. एखादी व्यक्ती स्वत:ला योद्धा म्हणते, तेव्हा तिची जबाबदारी कैकपटींनी वाढलेली असते. जिच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, तीच व्यक्ति तुमच्या आयुष्यातील योद्धा असू शकते. समोरची व्यक्ति कुठल्याही स्थितीत आपला विश्वासघात करणार नाही, असे तुम्हाला वाटायला हवे. ही एक मोठी जबाबदारी आहे, असेही अक्षय म्हणाला.ट्विंकल एक अभिनेत्री आहे. शिवाय एक लेखिका सुद्धा. अक्षयशी लग्नबंधनात अडकल्यानंतर ट्विंकलने अभिनयाची कारकिर्द सोडून स्वत:ला घरच्या जबाबदा-यांत गुंतवून घेतले.अक्षयचे म्हणाल तर अक्षय सध्या ‘जॉली एलएलबी2’मध्ये व्यस्त आहे. यात अक्षय एका वकीलाच्या भूमिकेत आहे. फेब्रुवारीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो. यापाठोपाठ ‘टॉयलेट: एक प्रेमकथा’ आणि ‘2.0’ असे अक्षयचे दोन सिनेम प्रदर्शित होत आहे. यानंतर ‘पॅडमॅन’ या चित्रपटातही अक्षय दिसणार आहे. शिवाय ‘नाम शबाना’मध्ये तो कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहे.