अक्षय कुमारचा मुलगा आरव पुन्हा दिसला मित्रांसोबत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2017 16:10 IST
एका बड्या स्टारचा मुलगा, खरे तर ही अनेकांसाठी मिरवण्याची बाब असू शकते. पण आरव भाटिया याला विचाराल तर एका ...
अक्षय कुमारचा मुलगा आरव पुन्हा दिसला मित्रांसोबत!
एका बड्या स्टारचा मुलगा, खरे तर ही अनेकांसाठी मिरवण्याची बाब असू शकते. पण आरव भाटिया याला विचाराल तर एका बड्या स्टारचा मुलगा होणे, जणू त्याच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. आता हा आरव कोण हे विचारू नका. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा मुलगा आरव आता लहान राहिलेला नाही. तर चांगलाच मोठा झाला आहे. मौजमस्तीच्या या वयात मित्र-मंडळींचा गोतावळा त्यामुळेच कॉमन आहे. पण सध्या आरव जिथे जाईल तिथे, मीडिया त्याचा पाठलाग करताना दिसतोय. आरव कुठेही दिसो, तो दिसला रे दिसला की, कॅमेºयांची क्लिक क्लिक सुरु. पण कदाचित आरवला हे फार आवडत नाही. केवळ आरवलाच नाही तर त्याच्या मित्रांनाही हे फारसे रूचत नाही. काल रात्री आरव आपल्या मित्रांसोबत जुहू पीव्हीआरला गेला होता. तेथून निघणार तोच, कॅमेºयांच्या नजरांनी त्यांना गाठले आणि मग क्लिक क्लिक सुरु झाले. नेहमीप्रमाणे आरव आणि त्याचा मित्रांना हे अजिबात आवडले नाही. आरवच्या मित्रांनी हातांनी चेहरा लपवला. पण बिचारा आरव चेहरा लपवून लपवून किती लपवणार. यापूर्वीच्या आरवच्या अनेक फोटोत तो चेहरा लपवताना दिसला होता. पण काल आरव असा कुठलाही खटाटोप करण्यापेक्षा शांतपणे कॅमेºयांना सामोरा गेला. अर्थात त्याच्या चेहºयावरची नाराजी लपली नाही. स्टार किड्स होण्याचा फायदा आहे, तसाच तोटाही. आता आरव याचा फायदा करून घेतो की, स्टार किड्स होण्याच्या या सौभाग्याला तोटा समजून बसतो, ते येणारा काळ सांगेलच. तूर्तास आपण आरवचे काही फोटो पाहूयात!