Join us  

अक्षय कुमारपेक्षा कैकपटीने श्रीमंत आहे त्याची बहीण; जाणून घ्या तिच्या संपत्तीविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 6:00 AM

Akshay kumar: खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारच्या बहिणीचं नाव अलका भाटिया असं आहे. मात्र, अलका कायम सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते.

'खिलाडी', 'मोहरा', 'धडकन', 'मुझसे शादी करोगी' अशा कितीतरी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार (Akshay Kumar). उत्तम अभिनयाच्या जोरावर अक्षयने प्रेक्षकांच्या मनात त्याच हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे आज बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार म्हणून तो ओळखला जातो. बऱ्याचदा सोशल मीडियावर अक्षयसोबतच त्याच्या कुटुंबीयांचीही चर्चा होत असते. यात सध्या त्याच्या बहिणीची चर्चा रंगली आहे. अक्षयची बहीण कमाईच्या बाबतीत त्याच्या तोडीस तोड असून ती कोणता व्यवसाय करते याविषयी जाणून घेऊयात.

खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारच्या बहिणीचं नाव अलका भाटिया असं आहे. मात्र, अलका कायम सोशल मीडियापासून दूर राहण्याचा प्रयत्न करते. अलकाने वयाच्या ४० व्या वर्षी लग्न केलं. विशेष म्हणजे अलकाने तिच्यापेक्षा वयाने १५ वर्ष मोठ्या असलेल्या व्यक्तीची पती म्हणून निवड केली. त्यामुळे लग्नाच्या वेळी तिच्या नवऱ्याचं वय ५५ वर्ष होतं. अलकाचं लग्न त्यावेळी चांगलंच चर्चेत आलं होतं.

कोण आहे अलकाचा नवरा?

अलकाने सुरेंद्र हिरानंदानी यांच्यासोबत लग्न केलं आहे. सुरेंद्र हे हिरानंदानी ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत.  मात्र, अलका आणि सुरेंद्र यांच्या वयातील अंतरामुळे अक्षय कुमार या लग्नास तयार नसल्याचं सांगण्यात येतं. मात्र, बहिणीच्या हाट्टापुढे त्याला झुकतं माप घ्यावं लागलं.  सुरेंद्र यांनी अलकासोबत दुसरं लग्न केलं आहे. यापूर्वी त्यांनी प्रीतीसोबत लग्न केलं होतं. मात्र, २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी अलकासोबत लग्न केलं. विशेष म्हणजे सुरेंद्र प्रसिद्ध बिझनेसमॅन आहेत. इतकंच नाही तर त्यांचा समावेश देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत केला जातो.  विशेष म्हणजे फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, २०१८ मध्ये त्यांची एकूण संपत्ती १.२९ बिलिअन डॉलर इतकी होती. आता या संपत्तीत वाढ झाल्याचं सांगण्यात येतं.  

टॅग्स :अक्षय कुमारसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा