केसरीच्या सेटवर अक्षय कुमारची लहान मुलांसोबत मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 13:48 IST
अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपट आताच रिलीज झाला आहे. महिलांच्या मासिळ पाळीबाबत सामान्य माणसांमध्ये जागरूकता पसरविण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला ...
केसरीच्या सेटवर अक्षय कुमारची लहान मुलांसोबत मस्ती
अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपट आताच रिलीज झाला आहे. महिलांच्या मासिळ पाळीबाबत सामान्य माणसांमध्ये जागरूकता पसरविण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला आहे. आता पुन्हा अक्षय कुमार त्याच्या नवीन चित्रपटा मार्फत लोकांपुढे एक नवीन विषय घेऊन येत आहे त्याचा आगामी चित्रपट 'केसरी' हा असून तो सारागढी युद्धावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वी अक्षयचा केसरी चित्रपटासाठी केलेला लूक आऊट झाला होता. त्याच्या फर्स्ट लूकची सगळीकडे चांगलीच चर्चा झाली. केसरी चित्रपटाचा निर्माता करण जोहरने अक्षयचा हा फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अक्षयने सैनिकांचा वेशात दिसला होता. सैनिकाच्या गणवेशात तो अत्यंत प्रभावशाली दिसत होता. आता पुन्हा एकदा या चित्रपटाच्या सेटवरचे काही फोटोसमोर आले आहेत. त्यात अक्षयकुमार अफगाणी मुलांबरोबर पोझ देताना दिसतो आहे. त्याने तीन मुलांना आपल्या मिठीत घेतले आहे.या चित्रपटात अक्षय कुमार हवालदार ईश्वर सिंगची भूमिका साकारत आहे. यात त्याच्या अपोझिट परिणीती चोप्रा दिसणार आहे. परिणीतीची अक्षयसोबत काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अजून या चित्रपटाचे शूटिंग बाकी आहे.ALSO READ : अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटाचा टीजर आऊटसारगढी युद्धाची कहाणी शीख इतिहासात मोठ्या गर्वाने सांगितली जाते. हे युद्ध १८९७ मध्ये झाले होते. ब्रिटिश इंडियन आर्मीसाठी ३६ शीख रेजिमेंटने या युद्धात आपल्या साहसाची ओळख करून दिली होती. आपल्या २१ सैनिकांना घेऊन इश्वर सिंगने १० हजार सैन्याला दोन वेळा पराभूत केले होते. दुर्दैवाने तिसऱ्या वेळेस त्याचा पराभव झाला पण पूर्ण ब्रिटिश आर्मी येईपर्यंत त्यांनी १० हजार सैन्याला थोपवून ठेवले होते. केसरी हा चित्रपट शूरवीर इश्वर सिंगची गोष्ट सांगणार आहे. याच लढाईवर दिग्दर्शक राजकुमार संतोषी ‘बॅटल आॅफ सारागढी’ हा चित्रपट साकारत आहेत. या चित्रपटासाठी अक्षयने चालवण्याचे, तलवारबाजीचे प्रशिक्षण घेतो आहे. तसेच तो पंजाबमधील प्रसिद्ध गटका या देसी मार्शल आर्टचे देखील ट्रेनिंग घेत आहे.