Join us

अक्षयकुमारच्या एक्स गर्लफ्रेंड रविना टंडन अन् शिल्पा शेट्टी एकाच व्यासपीठावर आल्या असता काहीसे असे घडले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 16:48 IST

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याच्याकडे सध्या इंडस्ट्रीमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून बघितले जाते. अक्षय त्याच्या चित्रपटात बिझनेसबरोबरच चित्रपटाच्या आशयावरही विशेष ...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याच्याकडे सध्या इंडस्ट्रीमधील एक यशस्वी अभिनेता म्हणून बघितले जाते. अक्षय त्याच्या चित्रपटात बिझनेसबरोबरच चित्रपटाच्या आशयावरही विशेष भर देताना दिसतो. वास्तविक अक्षयमधील हा बदल अलीकडच्या काळामध्येच बघावयास मिळत आहे. होय, सुरुवातीला अक्षय त्याच्या चित्रपटांऐवजी त्याच्या लव्ह अफेयर्समुळेच अधिक चर्चेत असायचा. ९० च्या दशकात ज्या अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले, त्यामध्ये सर्वाधिक चर्चेत रविना टंडन आणि शिल्पा शेट्टी यांची नावे राहिली. नुकतेच रविना आणि शिल्पा एका रिअ‍ॅलिटी टीव्ही शोच्या व्यासपीठावर एकत्र आल्या होत्या. त्यामुळे त्याठिकाणी जे घडले ते प्रेक्षकांसाठी एंटरटेन्मेंट पॅकेज ठरले. ‘सुपर डान्सर-२’ नावाच्या शोमध्ये रविना अभिनेता गोविंदाबरोबर पोहोचली होती. या शोच्या जज पॅनलमध्ये शिल्पा शेट्टी असल्याने रविना आणि शिल्पाला एकत्र बघणे मजेशीर होते. त्याचबरोबर शोमधील स्पर्धकांना या दोघींची पोलखोल करण्याचीही संधी होती. अशात स्पर्धकांनी संधीचा पुरेपूर फायदा घेताना त्यांच्या अनेक किश्श्यांचा उलगडा केला. त्याचबरोबर रविना आणि शिल्पानेदेखील बिनधास्तपणे विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. सूत्रानुसार, रविनाने म्हटले की, ‘आयुष्यात माझ्याकडून खूप काही चुका घडल्या. तेव्हा मध्येच शिल्पाने तिला डोळ्याने खुणावत म्हटले की, तुझ्या आणि माझ्या काही चुका कॉमन आहेत. शिल्पाचे हे वाक्य उपस्थिताना चांगलेच समजल्याने एकच हशा पिकला. पुढे लोक जेव्हा त्यांच्या ‘गोलमाल’विषयी चर्चा करीत होते तेव्हा रविनाने सांगितले की, ‘प्रत्येकानेच आयुष्यात गोलमाल केला आहे. शिल्पा आणि मीदेखील तसाच गोलमाल केला आहे. तुम्हाला आता कळून चुकले असेल की, मी काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.’ मात्र रविनाने याविषयी बिनधास्तपणे सांगणे टाळले. ९० च्या दशकात रविना आणि शिल्पा दोघींचेही अक्षयकुमारसोबत अफेअर होते. असो, रविना आणि शिल्पा बºयाच काळानंतर एका व्यासपीठावर एकत्र आल्यामुळे प्रेक्षकांसाठी त्यांचा हा एपिसोड चांगलाच मनोरंजनात्मक ठरला आहे.