अक्षय कुमारच्या मेहुण्यालाही बॉलिवूडचे वेध! ‘या’ चित्रपटातून करणार ग्रॅण्ड डेब्यू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 10:40 IST
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याचा मेहुणा करण लवकरच बॉलिवूड डेब्यू करतोय. आता डिम्पल कपाडियाला दोनच मुली आहेत, तेव्हा अक्षयचा ...
अक्षय कुमारच्या मेहुण्यालाही बॉलिवूडचे वेध! ‘या’ चित्रपटातून करणार ग्रॅण्ड डेब्यू!!
बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार याचा मेहुणा करण लवकरच बॉलिवूड डेब्यू करतोय. आता डिम्पल कपाडियाला दोनच मुली आहेत, तेव्हा अक्षयचा मेहुणा कुठून उगवला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, करण हा डिम्पलचा नाही तर तिची बहीण सिम्पल कपाडियाचा मुलगा आहे. सिम्पलचा मुलगा करण आता २४ वर्षांचा झाला आहे. खबर खरी मानाल तर, करण लवकरच टोनी डिसूजाच्या चित्रपटात दिसणार आहे. टोनी डिसूजासोबत अक्षयने ‘ब्लू’ आणि ‘बॉस’ असे दोन चित्रपट केलेत. त्यामुळे साहजिक टोनी व अक्षय दोघेही चांगले मित्र आहेत. कदाचित याच कारणामुळे टोनीच्या प्रॉडक्शनमधून करण बॉलिवूड एन्ट्री करतोय. करणने या वृत्ताला अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे. त्याने सांगितले की, लहानपणी मी खूप लाजाळू होतो. त्यामुळे मी चित्रपटात करिअर करू इच्छितो, याची कुणी कल्पनाही केली नव्हती. वयाच्या १४ वर्षी मी अॅक्टिंगमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. मावशी डिम्पल कपाडिया आणि अक्षयला मी तेव्हाच माझा निर्णय सांगितला होता. त्यांनी मला खूप पाठींबा दिला. बॉलिवूडमध्ये करिअर करणे वाटते तितके सोपे नाही, याची मला कल्पना आहे. येथे टिकायचे तर टॅलेंट आणि मेहनत या दोन गोष्टी तुमच्यात हव्याच हव्यात. लहानपणी माझे वजन खूप जास्त होते. पण अॅक्टिंग करिअरसाठी मी माझे वजन बरेच कमी केले. मी आत्तापर्यंत काही आॅडिशन दिलेत. मात्र त्यांनी मला रिजेक्ट केलेत. माझ्यात अॅक्टर बनण्याचे कुठलेही स्किल नाही, असे काहींनी मला तोंडावर सुनावले. पण त्यांच्या या प्रतिक्रिया मी पॉझिटीव्ह घेतल्या. मला आनंद आहे की, करिअरच्या सुरवातीलाच मी रिजेक्शन पाहिलेय. त्यामुळे माझी पुढची वाट सोपी झाली, असे मला वाटतेय. ALSO READ : 1 महिन्यात अक्षयच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केला कोटींचा बिझनेस.. वाचा सविस्तरबॉलिवूडमधील नेपोटिजमच्या मुद्यावरही करण बोलला. माझ्या कुटुंबाने माझ्यासाठी कुण्याही प्रोड्यूसरला फोन केला नाही. पण हो, माझ्या सारख्या कुटुंबातून येण्याचा एक फायदा मात्र असतोच, तो म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीतल्या लोकांना सहज भेटू बोलू शकता. आऊटसाईडरसाठी हेच काम कठीण होऊन बसते.