Join us

अक्षय कुमाराची शाहिद जवानांच्या कुटुंबीयांना मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 16:14 IST

अभिनेता अक्षय कुमार यांने भारत के वीर या उपक्रमाअंतर्गत जमा झालेली 6 कोटी 50 लाखांची रक्कम  शहिद जवानांच्या कुटुंबीयांच्या ...

अभिनेता अक्षय कुमार यांने भारत के वीर या उपक्रमाअंतर्गत जमा झालेली 6 कोटी 50 लाखांची रक्कम  शहिद जवानांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केली.  ​रणांगणात हौतात्मा पत्करणाऱ्या कुटुंबियांची काळजी घेण्याच्या उद्देशाने अक्षय कुमार यांनी “भारत के वीर” या उपक्रमाची उभारणी केली. या माध्यमातून लष्कर आणि निमलष्करी दलातील शहीद अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना अर्थ साह्य उपलब्ध करून देण्यात येईल. या उपक्रमाला भारत सरकारचा पाठींबा लाभला आहे.  भारत के वीर  अक्षय कुमार यांनी एमओएजीआयसीमध्ये उपस्थित कॉर्पोरेट्सना पुढे येऊन या सत्कर्मात उपक्रमास हातभार लावण्याचे आव्हान केले होते. अक्षय कुमारच्या आव्हानाला प्रतिसाद देत सीईओ आणि कॉर्पोरेटमधल्या दिग्गजांनी ही मोठी रक्कम उभी केली. यावेळी मोतीलाल ओसवाल यांच्याकडून ही मदत जम्मू-काश्मीरच्या सर्व जवानांना देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. तर अक्षयचा जिवलग मित्र विकी ओबेरॉय याने आंध्र प्रदेशची निवड केली. उद्योजक पुनीत दालमिया यांनी आसाम, ओरिसा आणि तामिळनाडू राज्यातील हुतात्म्यांना साह्य केले. समीर गेहलोत यांनी हरियाणाची निवड केली असून तर क्रिअर्ज एन्टरटेनमेंटच्या सिनेनिर्मात्या प्रेरणा अरोरा यांनी हिमाचल प्रदेशची निवड केली. क्वालिटी मिल्कने राजस्थानमधील सर्व जवानांना मदत पुरविण्याचे वचन घेतले तर या उपक्रमाकरिता एल अँड टीकडून 50 लाखांचे दान करण्यात येणार असल्याची घोषणा झाली.   मोतीलाल ओसवाल 13 वी अॅन्युअल ग्लोबल इन्व्हेस्टर कॉन्फरन्स (13 वी एमओएजीआयसी 2017) ही भारतातील सर्वात मोठी गुंतवणूकदार परिषद ठरली. यामध्ये क्षेत्रातील 150 हून अधिक अग्रेसर भारतीय कंपन्या आणि जगभरातील अंदाजे 700 संस्थात्मक गुंतवणूकदार, फंड मनेजर, हेज फंड्सनी 13 वी एमओएजीआयसी 2017 मध्ये सहभाग नोंदवला.