Join us

​अक्षय कुमार Vs मल्लिका दुआच्या वादात ट्विंकल खन्नाची उडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 11:55 IST

टीव्ही शो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टी चॅलेंज’च्या सेटवर बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि कॉमेडियन मल्लिका दुआ यांच्यातील वाद आता ...

टीव्ही शो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टी चॅलेंज’च्या सेटवर बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि कॉमेडियन मल्लिका दुआ यांच्यातील वाद आता जगजाहिर झाला आहे. मल्लिका दुआ आणि तिचे वडिल विनोद दुआ यांनी या वादावर जाहिरपणे अक्षय कुमारला सोशल मीडियावर सुनावले होते.  ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या टीव्ही शोची जज म्हणून दिसलेल्या मल्लिकावर अक्षय कुमारने अशी काही टीप्पणी केली होती की, मल्लिकाचे वडिल व ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ जाम भडकले होते.  अक्षयने शोमध्ये वापरलेल्या भाषेवर तीव्र आक्षेप नोंदवत त्यांनी एक क्लिपिंग शेअर केली होती. या क्लीपमध्ये  अक्षय मल्लिकाला उद्देशून ‘मल्लिकाजी आप बेल बजाओ, मैं आपको बजाता हूं,’ अशी टिप्पणी करताना दिसला होता. मल्लिकाच्या वडिलांनी अक्षयच्या नेमक्या याच वाक्यावर संताप व्यक्त केला होता. या वादावर अक्षय अद्यापही काही बोललेला नाही. पण अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना हिने मात्र काल रविवारी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ‘गंमत गमतीत घेतली तर ठीक़. विनोद निर्मितीसाठीचे शब्द नेहमीच गमतीत घेतले जायला हवेत. मी नेहमीच विनोद निर्मितीच्या स्वातंत्र्यावर भर दिला आहे,’असे ट्विंकलने अक्षयचा बचाव करताना लिहिले होते. यानंतर आज दुस-या दिवशी ट्विंकलने यावर मुद्यावर काही जोक्स शेअर केलेत. केवळ शेअर केले नाही तर यातून मल्लिका दुआ हिला चांगलेच डिवचलेही आहे.ALSO READ: अक्षय कुमारच्या ‘त्या’ कमेंटने भडकले मल्लिका दुआचे पापा! वाचा, सविस्तर घटना!!‘अक्षय कुमारच्या आवडत्या गाडीचे नाव काय? ‘बेल’गाडी’,असा पहिला जोक तिने शेअर केला आहे. या जोकमधून ट्विंकलने ‘बेल बजाओ’ कमेंट्सची खिल्ली उडवली आहे. दुस-या जोकमध्ये ट्विंकलने थेट मल्लिका दुआ हिचे आडनावचं शेअर केले आहे. ‘अक्षय कुमार मशिदीत का जातो? जेणेकरून तो काही ‘दुआ’ ऐकू शकेल,’ असा दुसरा जोक तिने शेअर केला आहे. हे दोन्ही जोक्स शेअर करण्यापासून मी स्वत:ला रोखू शकले नाही, असे ट्विंकलने लिहिले आहे. आता ट्विंकलच्या या दोन्ही जोक्सवर मल्लिका कशी रिअ‍ॅक्ट करते ते बघूच.