Join us
Daily Top 2Weekly Top 5

स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर फेब्रुवारी महिन्यात अक्षय कुमार अग्रस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 13:34 IST

प्रभावी सामाजिक चित्रपट पॅडमॅनमुळे बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार फेब्रुवारी महीन्यात स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता असल्याचं दिसून ...

प्रभावी सामाजिक चित्रपट पॅडमॅनमुळे बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमार फेब्रुवारी महीन्यात स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टवर सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता असल्याचं दिसून आले आहे. पद्मावत चित्रपटाच्या सूमारास तरूण पिढीचा हार्टथ्रोब रणवीर सिंगने अक्षयला मागे टाकले होते. मात्र पॅडमॅनच्या रिलीजच्या महिन्यात लोकप्रियतेमध्ये खिलाडी कुमार पहिल्या क्रमांकावर, अमिताभ बच्चन दुस-या क्रमांकावर, सलमान खान तिसऱ्या आणि शाहरुख खान चौथ्या स्थानावर होते. तर रणवीर सिंग पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता.स्कोर ट्रेंड्सच्या अनुसार, जानेवारी महिन्यात 57.67 गुणांसह तिस-या स्थानी असलेला अक्षय फेब्रुवारी महिन्यात 36.83 गुणांची आघाडी घेत, 94.50 गुणांसह अग्रस्थानी पोहोचला.अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे. स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्विनी कौल ह्याविषयी सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधल्या 600 बातम्यांच्या स्रोताव्दारे हा डेटा एकत्र केला आहे. मीडियामध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार, हा डेटा मिळतो."अक्षयच्या रँकिंगमध्ये आलेल्या चढउताराचे विश्लेषण स्कोर ट्रेंडने केलंय. त्यानुसार, टॉयलेट: एक प्रेम कथा आणि पॅडमॅन ह्या सामाजिक विषयांवर असलेल्या दोन चित्रपटांमूळे अक्षय कुमारची जनमानसातली प्रतिमाच बदलली. बॉलीवूडच्या मुख्य प्रवाहात अशा पध्दतीचे चित्रपट घेऊन आल्याने अक्षयच्या लोकप्रियतेत वाढ झाली. त्याचप्रमाणे सीमेवर शहिद झालेल्या जवानांच्या कुटूंबियांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी सुरू झालेल्या 'भारत के वीर' ह्या सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतल्याने एक 'संवेदनशील आणि जागरूक' अभिनेत्याची अक्षय कुमारची प्रतिमा बनली आहे.अश्विनी कौल ह्याविषयी सांगतात, "फेसबुक, ट्विटर, व्हायरल न्यूज, वृत्तपत्रे आणि डिजिटल साइट्सवर अक्षयच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे त्याला पॅडमॅनच्या रिलीजच्या दरम्यान सर्वाधिक लोकप्रियता मिळाली."रिलीजच्या पहिल्या आठवड्यात ‘पॅडमॅन’ने ६२ कोटी रुपये कमावले.दुस-या आठवड्यात मात्र चित्रपट १३.५० कोटी रुपयांपर्यंतच मजल मारू शकला. सुरुवातीला अशी शक्यता वर्तविली जात होती की, हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळवेल. परंतु आतापर्यंत ज्या पद्धतीने चित्रपटाने कमाई केली त्यावरून ही आशा आता धूसर दिसत आहे. कारण ‘पॅडमॅन’नंतर बॉक्स आॅफिसवर ‘अय्यारी’ आणि ‘ब्लॅक पॅँथर’ हे दोन चित्रपट रिलीज झाले.‘अय्यारी’ला जरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी, ‘ब्लॅक पॅँथर’ या बॉलिवूडपटाला मात्र प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.