Join us
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाचा अक्षय कुमारलाही फटका! 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूटिंग पुन्हा रखडलं; दुबईतील शूटिंग रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 12:48 IST

दुबई विसरा! मुंबईच्या फिल्म सिटीत उभारले जाणार नाईट क्लब अन् कसीनो; निर्मात्यांचा मोठा निर्णय.

मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम अनेक गोष्टींवर दिसत आहे. सिनेमाच्या शूटिंगमध्येही बदल करावे लागत आहेत.  काही दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित 'किंग' सिनेमाचं दुबई शेड्युल रद्द झाल्याची बातमी आली होती.  तर आता अक्षय कुमारच्याही सिनेमाच्या दुबई शेड्युलवर परिणाम झाला आहे. दिग्दर्शक अहमद खान सिनेमाच्या संपूर्ण टीमला एका गाण्याच्या शूटिंगसाठी दुबईला घेऊन जाणार होते. मात्र आता हे शेड्युल रद्द करण्यात आले आहे.

अक्षय कुमारचा हा सिनेमा आहे 'वेलकम टू द जंगल'. दिग्दर्शक अहमद खान या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग दुबईत करणार होते. या गाण्यात सुनील शेट्टी, अर्शद वारसी, रवीना टंडन आणि परेश रावल यांसारखे दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. या सर्व कलाकारांच्या तारखा पुन्हा एकदा मिळवणे कठीण असल्याने, शूटिंग पुढे ढकलण्याऐवजी आता हे गाणे मुंबईतच चित्रित केले जाणार आहे.

या गाण्यासाठी आता मुंबईतील मढ आयलंड, गोल्डन टोबॅको स्टुडिओ आणि गोरेगाव फिल्म सिटी येथे अतिशय भव्य सेट उभारले जात आहेत. प्रॉडक्शन डिझायनर शैलेश महाडिक हे या सेटवर नाईट क्लब, कॅसिनो आणि प्रायव्हेट जेट्सचा असा माहोल तयार करणार आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना दुबईची कमतरता भासणार नाही.

निर्मात्यांनी परिस्थिती सुधारेल यासाठी महिनाभर वाट पाहिली, पण इस्रायल आणि इराणमधील तणाव कायम असल्याने अखेर हा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान, अनेकदा पुढे ढकलण्यात आलेला हा चित्रपट आता २६ जून २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : War hits Akshay Kumar! 'Welcome to the Jungle' shoot halted.

Web Summary : Middle East tensions halt Akshay Kumar's 'Welcome to the Jungle' Dubai shoot. The song will now be filmed in Mumbai with elaborate sets, aiming for a June 2026 release.
टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड