Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारने शेअर केला 'बच्चन पांडे'मधला फर्स्ट लूक, फॅन्स म्हणाले- जहर है यह अंदाज

By गीतांजली | Updated: January 7, 2021 17:38 IST

अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' चा लुक समोर आला आहे.

अक्षय कुमारच्या 'बच्चन पांडे' चा लुक समोर आला आहे, ज्यात अक्षय कुमार आपल्या दबंग स्टाईल दिसतो अहे.  नवीन वर्षाच्या मुहूर्तावर या सिनेमाच्या शूटिंगला राजस्थानमध्ये सुरूवात केली आहे.

 अक्षय कुमारने सिनेमाची पहिली झलक  शेअर केली आहे त्यात तो एका वेगळ्या लूकमध्ये दिसतोय. चेहऱ्यावर सुडाची भावना,गळ्यात मोठी चेन, हातात जाडजूड ब्रेसलेट आणि एक डोळा विचित्र अक्षय कुमारने हा फोटो शेअर करत म्हटले आहे की, 'नवीन वर्ष, जुने असोसिएशन, 'बच्चन पांडे'चे शूटिंग सुरू होत आहे. साजिद नाडियाडवाला सोबत हा माझा दहावा सिनेमा आहे, आशा आहे की अजुन ही होतील.  

या पोस्टमध्ये त्याने चाहत्यांकडून स्वतःसाठी शुभेच्छा मागितल्या आहेत आणि त्याच्या लूकवर चाहत्यांचं मतं ही मागितले आहे.

या चित्रपटामध्ये अक्षय कुमार सोबत क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत असून सर्व क्रू सध्या राजस्थानात आहे.जैसलमेरमध्ये  जवळपास 2 महिने शूटिंग चालणार असल्याची माहिती आहे. या सिनेमात अक्षय कुमार एका अभिनेता बनू इच्छिणाऱ्या एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयच्या मित्राच्या भूमिकेत अर्शद वारसी दिसणार आहे तर क्रिती सनॉन पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.  ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट फरहाद सामजी दिग्दर्शित करणार असून साजिद नाडियाडवाला चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारक्रिती सनॉन