Join us
Daily Top 2Weekly Top 5

सायन कोळीवाड्यासोबत आहे खिलाडी कुमारचं खास नातं; आजही पहाटे ४ वाजता जातो 'या' ठिकाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 17:50 IST

Akshay kumar: अक्षयने 'बडे मियां छोटे मियां' या सिनेमाच्या निमित्ताने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याचं सायन कोळीवाड्यासोबत असलेलं कनेक्शन सांगितलं.

बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या बडे मियां छोटे मियां या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत येत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफ स्क्रीन शेअर करत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सिनेमाची टीम या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यामध्येच अक्षयने नुकतीच युट्यूबर रणवीर अल्लाहबादिया याच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरेच खुलासे केले.

रणवीरच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये अक्षयने त्याच्या पर्सनल आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा केला. यात त्याने त्याचं सायन कोळीवाड्यासोबत असलेलं खास कनेक्शनही सांगितलं. विशेष म्हणजे आजही तो महिन्यातील एक दिवस न चुकता सायन कोळीवाड्यात जातो.

अक्षयने त्याच्या आयुष्यातील बराचसा काळ सायन कोळीवाड्यात काढला आहे. त्यामुळे आजही येथे त्याचं जुनं घर आहे. या जुन्या घरात त्याच्या बऱ्याचशा आठवणी आहेत. त्यामुळे तो महिन्यातून एकदा सायन कोळीवाड्यात जातो आणि बराच वेळ त्याच्या जुन्या थांबवतो.

"मी सकाळी ४ वाजता उठतो, माझी कार काढतो आणि सायन कोळीवाड्यामध्ये मी जिथे रहायचो त्या घरी थेट जातो. या घरासोबतच बांद्रा इस्टमध्ये सुद्धा माझं एक घर आहे तिथे पण मी जातो. या घरांसोबतच मी माझ्या शाळेतही फेरफटका मारुन येतो. तिथे डॉन बॉस्को चर्च आहे काही वेळा त्या चर्चमध्ये सुद्धा जातो.  मला या ठिकाणांना भेट देणं आवडतं. मी सगळ्यात आधी जिथे रहायचो ती बिल्डिंग आता तोडण्यात येणार आहे. मात्र, त्याजागी जी नवीन इमारत उभी राहील. तिथला तिसरा मजला मी विकत घेणार आहे," असं अक्षय म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "जुन्या घराविषयी माझ्याकडे खूप आठवणी आहेत. माझे वडील त्यावेळी ९ ते ६ अशी नोकरी करायचे. ते जेव्हा कामावरुन घरी यायचे त्यावेळी मी आणि माझी बहीण घराच्या बाल्कनीत उभं राहून त्यांची वाट पाहायचो. माझ्या या घराजवळ एक पेरुचं झाड आहे आजही तिथे पेरु लागले तर मी ते आवर्जुन तोडून खातो."