Join us
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अक्षय कुमार-प्रियदर्शनच्या 'भूत बंगला'ची रिलीज डेट जाहीर; 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 08:50 IST

अक्षय कुमार- प्रियदर्शन यांच्या बहुचर्चित भूत बंगला सिनेमाची रिलीज डेट अखेर जाहीर झाली असून प्रेक्षकांना सर्वांना आनंद झाला आहे

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन ही जोडी तब्बल १४ वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यांच्या आगामी 'भूत बंगला' (Bhooth Bangla) या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख (Release Date) अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. जाणून घ्या सिनेमाची रिलीज डेट

कधी होणार प्रदर्शित?

'भूत बंगला' हा चित्रपट १५ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे अधिकृत पोस्टर शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. "बंगल्यातून एक बातमी आली आहे! १५ मे २०२६ रोजी चित्रपटगृहात येत आहे 'भूत बंगला'," अशा कॅप्शनसह ही घोषणा करण्यात आली आहे.

या चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे याची स्टारकास्ट आहे. अक्षय कुमारसोबतच या चित्रपटात कॉमेडीचे बादशाह मानले जाणारे परेश रावल, राजपाल यादव आणि असरानी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. याशिवाय चित्रपटात तब्बू, वामिका गब्बी आणि जिस्सू सेनगुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रियदर्शनच्या जुन्या हिट चित्रपटांमधील ही कलाकार मंडळी पुन्हा एकत्र येत असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थान, जयपूर आणि हैदराबादमधील विविध ठिकाणी करण्यात आले आहे. 'भूत बंगला'ची निर्मिती शोभा कपूर, एकता कपूर आणि अक्षय कुमार यांनी त्यांच्या 'केप ऑफ गुड फिल्म्स' या बॅनरखाली केली आहे. तसेच बालाजी टेलिफिल्म्सचेही याला सहकार्य लाभले आहे. अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांनी यापूर्वी 'हेरा फेरी', 'भूल भुलैया', 'गरम मसाला' आणि 'खट्टा मिठा' यांसारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे 'भूत बंगला' पुन्हा प्रेक्षकांचं मन जिंकेल, यात शंका नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Kumar and Priyadarshan's 'Bhooth Bangla' release date announced.

Web Summary : Akshay Kumar and Priyadarshan reunite after 14 years for 'Bhooth Bangla,' a horror-comedy releasing May 15, 2026. The film stars Paresh Rawal, Rajpal Yadav, Tabu, and Wamiqa Gabbi. Produced by Shobha Kapoor, Ekta Kapoor and Akshay Kumar. Shot in Rajasthan, Jaipur and Hyderabad.
टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडतब्बूपरेश रावल