Join us

​अक्षय कुमारने ‘गोल्ड’साठी आकारली आतापर्यंतची सर्वाधिक फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 21:56 IST

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या सत्य घटनांवर आधारित चित्रपटात अधिक रस घेऊ लागला आहे. गत वर्षी त्याचे ‘एअरलिफ्ट’ व ...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार सध्या सत्य घटनांवर आधारित चित्रपटात अधिक रस घेऊ लागला आहे. गत वर्षी त्याचे ‘एअरलिफ्ट’ व ‘रुस्तम’ हे चित्रपट सत्य घटनांवर आधारित होते. आता अक्षय कुमार आणखी एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटाची घोषणा त्याने काही दिवसांपूर्वी ट्विटरहून केली होती. या चित्रपटाचे नाव गोल्ड असून हा चित्रफट त्याच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो असे सांगण्यात येत आहे. या चित्रपटासाठी अक्षय कु मारने तब्बल ५० कोटी रुपये फीस आकारली आहे असे सांगण्यात येत आहे. अक्षय कुमारचे २०१७ साली तब्बल चार चित्रपट रिलीज होत आहेत. हे चारही चित्रपट बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करू शकतात असा अंदाज लावण्यात येत आहे. २०१६ साली अक्षयचे तीन चित्रपट रिलीज झाले व तिनही चित्रपटांनी १०० कोटीहून अधिक कमाई केली होती. आता आगामी गोल्ड या चित्रपटासाठी अक्षयने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक फी आकारली असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या चर्चेत असलेल्या बातम्यांनुसार अक्षय कुमारने ‘गोल्ड’ या चित्रपटासाठी ५० कोटी रुपये आकारले आहे. अक्षय हा सध्या भरवशाचा स्टार म्हणून उदयास आला आहे. अशावेळी त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी निर्माते मागेपुढे पाहत नसल्याचे सांगण्यात येत आहे. ‘गोल्ड’ हा चित्रपट भारतीय हॉकी खेळाडू बलबीर सिंह यांच्या जीवनावर आधारित आहे. बलबीर सिंग यांच्या नेतृत्वातील हॉकी संघाने १९४८, १९५२ व १९५६ साली झालेल्या आॅलिंपिक स्पर्धेत स्वर्णपदक मिळविले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार बलबीर सिंग यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रीमा कागती करणार आहेत. या चित्रपटाची कथा व पटकथा जबदरस्त असल्याने या चित्रपटासाठी अक्षयला फिल्मफेअर व राष्ट्रीय पुरस्कार मिळू शकतो. मात्र हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल. गोल्ड हा चित्रपट १५ आॅगस्ट २०१८ साली प्रदर्शित होणार आहे.