Join us

अक्षयकुमारला घोषित केले जगातील पहिला सुपरस्टार, वाचा काय आहे प्रकरण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 18:57 IST

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाबद्दल दरदिवसाला काही ना काही बातमी समोर येत आहे. जेव्हा अक्षयने हा ...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याच्या आगामी ‘पॅडमॅन’ या चित्रपटाबद्दल दरदिवसाला काही ना काही बातमी समोर येत आहे. जेव्हा अक्षयने हा चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांनी त्याचे समर्थन केले. कारण अक्षयचा हा चित्रपट सामाजिक मुद्द्यावर आधारित आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला त्याचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपटदेखील सामाजिकतेवर आधारित होता. शिवाय या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसादही दिला. या चित्रपटाच्या माध्यमातून अक्षयने साफसफाई आणि शौचालय यांसारख्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. आता पुन्हा एकदा अक्षय ‘पॅडमॅन’मधून एका महत्त्वपूर्ण विषयाची जनजागृती करताना दिसणार आहे. असो, आम्ही अक्षयच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी घेऊन आलो आहोत. होय, अक्षयला जगातील पहिला सुपरस्टार म्हणून घोषित करण्यात आले आहे. अक्षयला हा किताब कोण्या अकॅडमी अथवा संस्थेने दिला नसून, रिअल लाइफ पॅडमॅन अरुणाचलचे मुरुगनाथन यांनी दिला आहे. अक्षयचा हा चित्रपट अरुणाचलमधील मुरुगनाथन यांच्या जीवनावर आधारित असून, ते त्यामुळे खूपच आनंदी झाले आहेत. त्यांनी त्यांचा आनंद ट्विटरवर व्यक्त करताना लिहिले की, ‘अक्षयकुमार जगातील पहिला सुपरस्टार बनला आहे. ज्याने स्त्रियांच्या मासिक पाळीसंदर्भातील मुद्द्यावर चर्चा घडवून आणली आहे. मी खरोखरच आनंदी आहे की, माझी भूमिका अक्षयकुमार साकारत आहे. मुरुगनाथन यांच्या या ट्विटला अक्षयकुमारनेही उत्तर दिले आहे. त्याने लिहिले की, ‘मीदेखील खूपच आनंदी आहे की, मला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. अपेक्षा करतो की, या चित्रपटानंतर समाजात काही आमूलाग्र बदल घडवून येतील. लोकांनी या मुद्द्यावर चर्चा करायला हवी.’ मुरुगनाथन यांनी पुन्हा अक्षयच्या ट्विटला रिट्वििट करताना लिहिले की, डिअर अक्षयकुमार मीदेखील हीच अपेक्षा करतो. कारण तुझी मेहनत कधीच वाया जाणार नाही. या चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची प्रोड्युसर म्हणून अभिनेत्री ट्विंकल खन्ना जबाबदारी सांभाळत आहे. बºयाच वर्षांनंतर अक्षय आणि ट्विंकल एकत्र काम करीत आहेत. हा चित्रपट २६ जानेवारी २०१८ ला रिलीज होणार आहे.