Join us
Daily Top 2Weekly Top 5

OMG 3 मधून अक्षय कुमारचा पत्ता कट? भक्तांच्या मदतीला आता 'देवी' येणार; राणी मुखर्जी साकारणार भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:04 IST

ओह माय गॉड सिनेमाच्या आजवरच्या दोन्ही भागांमध्ये अक्षय कुमार 'देवा'च्या भूमिकेत भक्तांच्या हाकेला धावून जातो. पण तिसऱ्या भागात मात्र 'देवी'चं रुप दिसणार आहे

बॉलिवूडमधील अत्यंत यशस्वी फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'ओएमजी' (Oh My God) चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची म्हणजेच 'ओएमजी ३' ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मात्र, यावेळी चित्रपटात एक मोठा बदल पाहायला मिळणार आहे. गेल्या दोन भागांमध्ये देवाच्या भूमिकेत दिसलेला अक्षय कुमार यावेळी मुख्य भूमिकेत नसून, त्याच्या जागी राणी मुखर्जी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

राणी मुखर्जी 'देवी'च्या भूमिकेत

'ओएमजी ३' मध्ये राणी मुखर्जी एका देवीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वीच्या भागांमध्ये अक्षय कुमारने भगवान कृष्ण आणि भगवान शिवाच्या दूताची भूमिका साकारली होती. मात्र, तिसऱ्या भागात निर्मात्यांनी स्त्री देवतेच्या दृष्टिकोनातून कथा मांडण्याचे ठरवले आहे. राणी मुखर्जीचा या चित्रपटातील लूक आणि भूमिका अत्यंत वेगळी आणि प्रभावी असणार आहे.

अक्षय कुमारचा फक्त कॅमिओ?

चित्रपटाच्या चाहत्यांसाठी थोडी निराशाजनक बाब म्हणजे अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत नसेल. मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार या सिनेमात केवळ एका छोट्या पाहुण्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा राणी मुखर्जीच्या पात्राभोवती फिरणार असून, अक्षयचे पात्र केवळ कथेला वळण देण्यासाठी वापरले जाणार आहे.

'ओएमजी ३'चे दिग्दर्शन अमित राय करणार आहेत, ज्यांनी 'ओएमजी २'चे देखील यशस्वी दिग्दर्शन केले होते. यावेळचा विषय देखील सामाजिक आणि धार्मिक मुद्द्यांवर आधारित असणार आहे, जो प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल. राणी मुखर्जीने यापूर्वी 'मर्दानी' आणि 'श्रीमती चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' यांसारख्या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे, त्यामुळे ती या आध्यात्मिक भूमिकेला कसा न्याय देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार असून, २०२६ च्या अखेरीस तो प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अक्षय कुमारच्या जागी राणी मुखर्जीला 'देवी'च्या रूपात पाहण्यासाठी चाहते आतापासूनच उत्सुक आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Kumar out of OMG 3? Rani Mukerji as Goddess!

Web Summary : Rani Mukerji will star as a Goddess in OMG 3, replacing Akshay Kumar in the lead. He may have a cameo. The film, directed by Amit Rai, explores social and religious issues from a female perspective and is expected to release in 2026.
टॅग्स :राणी मुखर्जीअक्षय कुमारबॉलिवूड