अक्षयकुमारने अंधेरीतील एका पॉश बिल्डिंगमध्ये खरेदी केले चार फ्लॅट; किंमत वाचाल तर धक्का बसेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2017 20:49 IST
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार त्याच्या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखला जातो. गेल्या काही काळापासून अक्षयचा प्रत्येक चित्रपट बॉक्स आॅफिसवर धूम उडवून देत ...
अक्षयकुमारने अंधेरीतील एका पॉश बिल्डिंगमध्ये खरेदी केले चार फ्लॅट; किंमत वाचाल तर धक्का बसेल!
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार त्याच्या सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखला जातो. गेल्या काही काळापासून अक्षयचा प्रत्येक चित्रपट बॉक्स आॅफिसवर धूम उडवून देत आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की, अक्षयला प्रॉपर्टी खरेदी करण्यातही खूप रस आहे? होय, रिअल इस्टेट क्षेत्राकडे अक्षयचा कल कधीच लपून राहिला नाही. आता पुन्हा एकदा अक्षयकुमारने त्याच्या संपत्तीत वाढ करताना मुंबईतील अंधेरी परिसरात एका ३८ मजली पॉश बिल्डिंगमध्ये तब्बल चार फ्लॅट खरेदी केले. या प्रत्येक फ्लॅटची किंमत सुमारे ४.५ कोटी रुपये इतकी आहे. सध्या अक्षय पत्नी ट्विंकल, मुलगा आरव आणि मुलगी नितारासोबत जुहूमध्ये एका डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहतो. त्याच्या अपार्टमेंटमधून समुद्राचा किनारा दिसतो. याव्यतिरिक्त अक्षयचा लोखंडवाला येथे एक फ्लॅट आणि बांद्रा परिसरात डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये आहे. त्याचबरोबर गोव्यातील अंजुनामध्ये पोर्तुगाली शैलीचा एक व्हिला त्याने खरेदी केला आहे. आता त्याने चार फ्लॅट खरेदी केल्याने त्याच्या संपत्तीत वाढ झाली आहे. अक्षयची भारताबरोबरच विदेशात प्रचंड संपत्ती आहे. विदेशातील काही देशांमध्ये त्याचे आलिशान बंगले आहेत. सध्या अक्षयकुमार इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळापासून बॉक्स आॅफिसवर त्याची जादू चालत आहे. ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगला गल्ला जमविला होता. त्याचबरोबर तो आगामी काळात ‘पॅडमॅन’ आणि ‘२.०’ या बिग बजेट चित्रपटात झळकणार आहे. त्याचे हे दोन्ही चित्रपट पुढच्यावर्षी रिलीज होणार आहेत. ‘२.०’ हा सायन्स फिक्शन चित्रपट असून, त्यामध्ये अक्षय जबरदस्त खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयने कधीही पडद्यावर असा खलनायक साकारला नसल्याने त्याच्या चाहत्यांना त्याचा हा अवतार धक्का देणारा ठरणार आहे. या चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत प्रमुख भूमिकेत आहेत.