अक्षय कुमार बनला ‘पॅडमॅन’; पाहा, नवे पोस्टर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 11:48 IST
‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटानंतर अक्षय कुमार ‘पॅडमॅन’ हा चित्रपट घेऊन येतो आहे. मुळात बायोपिक असलेल्या या चित्रपटाचे ...
अक्षय कुमार बनला ‘पॅडमॅन’; पाहा, नवे पोस्टर!
‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटानंतर अक्षय कुमार ‘पॅडमॅन’ हा चित्रपट घेऊन येतो आहे. मुळात बायोपिक असलेल्या या चित्रपटाचे अक्षयने जोरदार प्रमोशन चालवले आहे. काही वेळापूर्वी अक्षयने या चित्रपटाचे अर्धे पोस्टर आऊट केले आणि त्यानंतर काही तासांतच ‘पॅडमॅन’चे पूर्ण पोस्टर रिलीज करण्यात आले. पहिल्या अर्ध्या पोस्टरमध्ये केवळ अक्षयचा अर्धा चेहरा दिसला. पण त्यानंतरच्या पोस्टरमध्ये पांढरा पायजामा व पांढरा शर्ट अशा वेषात अक्षय दिसतोय. ‘सुपर हिरो है ये पगला’ असे या पोस्टरवर लिहिले आहे. शिवाय चित्रपटाची रिलीज डेटही पोस्टरवर आहे. आर. बल्की दिग्दर्शित हा चित्रपट २६ जानेवारी २०१८ रोजी रिलीज होणार आहे. ‘पॅडमॅन’ या चित्रपटात अक्षयशिवाय सोनम कपूर आणि राधिका आपटे मुख्य भूमिकेत आहेत. केवळ इतकेच नाही तर, या चित्रपटासोबत अक्षयची पत्नी टिष्ट्वंकल खन्ना निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवतेय. हा चित्रपट टिष्ट्वंकलने प्रोड्यूस केलेला आहे. . चित्रपटात राधिका अक्षयच्या पत्नीच्या भूमिकेत असेल; तर सोनम अक्षयची लव्ह इंट्रेस्ट असेल. महानायक अमिताभ बच्चन हेदेखील चित्रपटात भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहेत. ALSO READ : अक्षय कुमारसाठी नवे नाहीत वाद! अनेकदा फसलायं वादात!!‘पॅडमॅन’ हा चित्रपट अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या जीवनाचा संघर्ष व स्वस्त सॅनिटरी पॅड तयार करण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दाखविण्यात येणार आहे. अॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळविणाºया अक्षय कुमारने मागील काही वर्षांपासून आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून समीक्षकांचे लक्ष वेधले आहे. या दरम्यान त्याने काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. त्याचा‘पॅडमॅन’ हा याच मालिकेतील चित्रपट आहे.