Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारची 100 कोटींची डील ; फक्त 45 दिवस शूटींग आणि दरदिवशी 2 कोटी !!

By रूपाली मुधोळकर | Updated: November 16, 2020 11:11 IST

होय, या सिनेमासाठी अक्षयने किती मानधन घ्यावे तर 100 कोटी रूपये. 

ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वीच अक्षयने रंजीत तिवारीचा स्पाई थ्रिलर ‘बेल बॉटम’चे शूटिंग केले आहे आणि सध्या तो यशराज बॅनरचा चित्रपट ‘पृथ्वीराज’मध्ये व्यग्र आहे.

अक्षय कुमार बॉलिवूडचा सर्वाधिक बिझी अभिनेता आहे. यापुढे कदाचित सर्वाधिक महागडा अभिनेता, असेही अक्षयबद्दल म्हणावे लागणार आहे. होय, आगामी सिनेमासाठी अक्षयने घेतलेल्या फीचा आकडा वाचून तुम्हीही हेच म्हणाल. या सिनेमासाठी अक्षयने किती मानधन घ्यावे तर 100 कोटी रूपये. अक्षयने दिग्दर्शक मुदस्सर अजीज यांचा एक कॉमेडी सिनेमा साईन केल्याची खबर अलीकडेच आली होती. हा सिनेमा जॅकी व वासू भगनानी प्रोड्यूस करत आहेत. या सिनेमासाठी अक्कीला तब्बल 100 कोटी फी देण्यात आल्याचे कळतेय.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘बेल बॉटम’ या सिनेमाचे शूटींग सुरु असतानाच अक्षयने या कॉमेडी सिनेमासाठी होकार दिला होता. या आगामी सिनेमाचा प्रॉडक्शन बजेट 35 ते 40 कोटी रूपये आहे. मात्र एकूण बजेट 150 कोटी रूपयांवर पोहोचला आहे. कारण केवळ अक्षय कुमारलाच मानधनापोटी 100 कोटी रूपये फी देण्यात येणार आहे. हा सिनेमा अक्षय केवळ 45 दिवसांत पूर्ण केले. यामुळे चित्रपटात संभाव्य तोट्याची शक्यता कमी आहे. तसेही सॅटेलाईट, डिजिटल आणि म्युझिक राईट्स विकून चित्रपटावर लागलेले अर्धे पैसे वसूल होतील. बाकीचे अर्धे पैसे थिएटरमधून निघतील.  

या सिनेमाचे शूटींग पुढील वर्षी जुलैच्या जवळपास सुरु होईल आणि ऑगस्टच्या अखेरपर्यंत सिनेमा बनून तयार होईल. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, मुदस्सर अजीजच्या चित्रपटासोबत अक्षय कुमारला एक सोशल ड्रामा आणि एक्शन थ्रिलर चित्रपटाची देखील आॅफर देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय कुमारकडे जवळपास एकूण १० चित्रपट आहेत. ज्यांचे शूटिंग २०२१ पर्यंत पूर्ण होईल.

 काही दिवसांपूर्वीच अक्षयने रंजीत तिवारीचा स्पाई थ्रिलर ‘बेल बॉटम’चे शूटिंग केले आहे आणि सध्या तो यशराज बॅनरचा चित्रपट ‘पृथ्वीराज’मध्ये व्यग्र आहे. ‘पृथ्वीराज; चित्रपटानंतर अक्षय कुमार दिग्दर्शक आनंद एल रायचा ‘अतरंगी रे;चे शूटिंग करणार आहे आणि त्यानंतर साजिद नाडियादवाला बॅनरखाली निर्मिती होणा-या ‘बच्चन पांडे’च्या शूटिंगला सुरूवात करणार आहे.अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटांची यादी इथे संपत नाही, ‘बच्चन पांडे’नंतर तो एकता कपूर निर्मित एका अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.

या बॉलिवूड अभिनेत्यावर होता काजोलचा क्रश, प्रीमिअरला गेली अन् पूर्णवेळ...

प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत दिसणार अक्षय कुमार, 'राम सेतु'चे पोस्टर्स आले समोर

टॅग्स :अक्षय कुमार