Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अक्षयने ‘फाईव्ह’साठी ठेवली अट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2016 16:01 IST

प्रियांका चोप्रासोबत  ‘मेरीकॉम’ आणि ऐश्वर्या रायला सोबत घेऊन ‘सरबजीत’ साकारणारे दिग्दर्शक उमंग कुमार यांनी आता ‘फाईव्ह’ नामक ‘थ्रीलर ड्रामा’ची ...

प्रियांका चोप्रासोबत  ‘मेरीकॉम’ आणि ऐश्वर्या रायला सोबत घेऊन ‘सरबजीत’ साकारणारे दिग्दर्शक उमंग कुमार यांनी आता ‘फाईव्ह’ नामक ‘थ्रीलर ड्रामा’ची तयारी सुरु केली आहे.   या चित्रपटात  बॉलिवूडचा खिलाडी पाच व्यक्तिरेखा साकारणार आहे, हे तुम्ही जाणताच. आता याचसंदर्भात आम्ही तुमच्यासाठी एक नवी माहिती घेऊन आलो आहोत. अक्षयने या चित्रपटासाठी होकार दिलाय. पण सहजी नाही तर एका अटीवर. होय, ‘फाईव्ह’मध्ये काम करण्यासाठी अक्षयने उमंग कुमार यांच्यासमोर एक अट ठेवली होती. ही अट मान्य झाली तेव्हाच अक्षयने आपला होकार कळवला. आता ही अट कोणती? तर या चित्रपटात मिथुन, जीत गांगुली आणि अमाल मलिक या संगीतकारांना घेण्याची अट अक्षयने ठेवली. अक्षयची ही अट उमंग कुमार यांनी मान्य केली आणि लागतीच अक्षयने चित्रपटास आपला होकार कळवला.