Join us
Daily Top 2Weekly Top 5

लखनऊ स्टेशनवर अक्षय-हुमाचा ‘गुड टाईम’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 12:59 IST

 २०१३ मध्ये ‘जॉली एलएलबी’ चित्रपट अर्शद वारसीच्या मुख्य भूमिकेत प्रदर्शित झाला होता. एक ‘स्ट्रगलिंग’ वकील एका ‘हिट अ‍ॅण्ड रन’ची ...

 २०१३ मध्ये ‘जॉली एलएलबी’ चित्रपट अर्शद वारसीच्या मुख्य भूमिकेत प्रदर्शित झाला होता. एक ‘स्ट्रगलिंग’ वकील एका ‘हिट अ‍ॅण्ड रन’ची केस सोडवतांना गुन्हेगारांसोबत लढतो. आता पुन्हा एकदा ‘जॉली एलएलबी २’ चर्चेत आला आहे.चित्रपटाचा हा सिक्वेल असून यात अक्षय कुमार आणि हुमा कुरैशी हे मुख्य भूमिकेत दिसतील. नुकतेच अक्षय कुमारने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याला अक्षयने कॅप्शन दिले आहे की,‘ ग्रिटिंग्ज फ्रॉम हुमा अ‍ॅण्ड मी धीस मॉर्निंग स्ट्रेट फ्रॉम लखनऊ स्टेशन!जॉली इंडीड इज हॅविंग अ जॉली गुड टाईम. ’ या फोटोत ते दोघे लखनऊ स्टेशनवर उभे आहेत. चित्रपटाची शूटींग लखनऊ, वाराणसी आणि काश्मीर येथे सुरू आहे. चित्रपट १० फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.