Join us

​राकेश रोशनच्या आगामी चित्रपटात दिसेल अक्षय-हृतिकची जोडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2017 18:48 IST

बॉलिवूडमध्ये एकेकाळी मल्टीस्टार चित्रपटांची निर्मिती होत होती. मात्र काळाच्या ओघात व बॉलिवूडमधील कॅम्पमुळे मल्टीस्टार चित्रपटांची संख्या रोडावली. आता केवळ ...

बॉलिवूडमध्ये एकेकाळी मल्टीस्टार चित्रपटांची निर्मिती होत होती. मात्र काळाच्या ओघात व बॉलिवूडमधील कॅम्पमुळे मल्टीस्टार चित्रपटांची संख्या रोडावली. आता केवळ मोठे निर्माते आपल्या चित्रपटातून असे प्रयोग करताना दिसतात. अनेक मल्टीस्टार चित्रपटाचे निर्माते राकेश रोशन यांना तो काळ पुन्हा यावा असे वाटत आहे. याचमुळे त्यांनी आपल्या आगामी चित्रपटात दोन मोठ्या कलावंतांना साईन करण्याचा निर्णय घेतला आहे. राकेश रोशन यांंच्या आगामी चित्रपट ‘क्रिश ४’ असेल असे सांगण्यात येते. मात्र याच दरम्यान राकेश रोशन एका मल्टीस्टार चित्रपटाची तैयारी करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच्या जवळ दोन नायक असलेले कथानक असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन व बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांनी भूमिक ा साकाराव्या असे राकेश रोशन यांना वाटते. जर हृतिक व अक्षय एकत्र आले तर तो निश्चितच मोठा चित्रपट असेल यात शंकाच नाही. दोन्ही कलाकारांच्या चाहत्यांना दोघांना एकत्र पाहण्याची संधी मिळेल. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरल्यास मल्टीस्टार चित्रपटांच्या निर्मितीवर भर दिला जाईल असेही रोशन यांना वाटते. मात्र सध्याच्या परिस्थीचा विचार केल्यास अक्षय कुमार संपूर्ण वर्षभर विविध चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त असेल. या वर्षी त्याचे चार चित्रपट रिलीज होत आहे. दुसरीकडे हृतिक रोशन देखील करण मल्होत्राच्या चित्रपटाची शूटिंग सुरू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच तो या वर्षाच्या मध्यांत ‘क्रिश ४’च्या शूटिंगला सुरुवात करू शकतो असेही सांगण्यात येत आहे. यामुळे यावर्षी तरी दोघेही या चित्रपटाची शूटिंग सुरू करू शकणार नाहीत. २०१८ मध्ये देखील अक्षयचे अनेक चित्रपट येत असल्याने त्याला राकेश रोशनला तारखा देणे जमेल का? असाही प्रश्न केला जात आहे. मात्र राकेश रोशन यांना नकार तरी कसा द्यावा हा प्रश्न अक्षयला पडू शकतो. दरम्यान अक्षय कुमार आणि हृतिक रोशन यांनी नुकताचा क्वालिटी टाईम एकत्र घालविला आहे. यामुळे राकेश रोशन यांचा प्रयत्न यशस्वी ठरू शकतो. अक्षय कुमार आता आपल्या अभिनयात अनेक प्रयोग करीत असल्याने तो होकार  देण्याची अधिक शक्यता आहे.