प्रीती, विद्या, सुश्मितानंतर अक्षरा हासन ‘गर्भवती’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 12:32 IST
प्रीती झिंटा, विद्या बालन, सुश्मिता सेन यांच्यानंतर अक्षरा हासन ही सुद्धा ‘गर्भवती’ होणार आहे. दचकलात ना? पण दचकू नका. ...
प्रीती, विद्या, सुश्मितानंतर अक्षरा हासन ‘गर्भवती’!
प्रीती झिंटा, विद्या बालन, सुश्मिता सेन यांच्यानंतर अक्षरा हासन ही सुद्धा ‘गर्भवती’ होणार आहे. दचकलात ना? पण दचकू नका. कारण आम्ही रिअल लाईफबद्दल नाही तर रिल लाईफबद्दल बोलतोय. आर. बल्की यांच्या ‘शमिताभ’ या चित्रपटातून अक्षराने बॉलिवूड डेब्यू केले होते. लवकरच अक्षरा ‘लाली की शादी में लड्डू दिवाना’ या चित्रपटात दिसणार आहे. याच चित्रपटात ती गर्भवती मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. खरे तर बॉलिवूडमध्ये अक्षरा केवळ दोन चित्रपटांएवढी जुनी आहे. त्यामुळे तिने गर्भवती मुलीच्या भूमिकेसाठी होकार द्यावा,यासाठी तिचे कौतुकच करायला हवे. अशा बोल्ड भूूमिकांना होकार देण्यासाठी काळीज लागते, हे सांगणे नकोच. ALSO READ : पाहा, ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’चा ट्रेलर!‘लाली की शादी में लड्डू दिवाना’ या चित्रपटाच्या अर्ध्या अधिक भागात अक्षरा प्रेग्नंट मुलीच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक मनिष हरीशंकर यांनी सांगितले की, कुठलीही नवी हिरोईन या भूमिकेसाठी तयार नव्हती. अक्षराने मात्र ही तयारी दाखवली. तिने यातील स्वत:च्या भूमिकेबद्दल कमी आणि एकूणच कथेबद्दल अधिक विचार केला. लोकांना अपिल होणारी कथा आहे, केवळ म्हणून अक्षराने हा चित्रपट स्वीकारला. ती या चित्रपटाचा भाग आहे, याचा मला आनंद आहे. हा चित्रपट एका महत्त्वपूर्ण मुद्यावर आधारित आहे. किशोरवयातील न कळत्या वयातील मातृत्व असा हा विषय आहे. अक्षरा या चित्रपटात वेगवेगळ्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षरा लाली नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध कंगोरे या चित्रपटात दिसणार आहेत. एक निष्पाप, नटखट मुलगी, नंतर एक स्वत:च्या पायावर उभी राहणारी मुलगी आणि यापश्चात नकळत मातृत्व ओढवून घेणारी आणि त्यास खंबीरपणे तोंड देणारी मुलगी यात दिसणार आहे.