अक्कीचे ‘जॉली गुड मॉर्निंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2016 13:28 IST
एका वर्षांत अनेक चित्रपट करणारा बॉलिवूडमधील अभिनेता कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे,अक्षय कुमार. अक्षय एकमेव असा अभिनेता आहे जो ...
अक्कीचे ‘जॉली गुड मॉर्निंग’
एका वर्षांत अनेक चित्रपट करणारा बॉलिवूडमधील अभिनेता कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे,अक्षय कुमार. अक्षय एकमेव असा अभिनेता आहे जो एका वर्षात अनेक चित्रपट साकारतो. सध्या अक्षय ‘जॉली एलएलबी २’ आणि नीरज पांडेंचा थ्रिलर ड्रामा ‘क्रॅक’ या दोन्ही चित्रपटांसाठी एकावेळी शूटींग करतो आहे.सध्या कुल्लू-मनाली येथे ‘जॉली एलएलबी २’च्या शूटींग शेड्यूलमध्ये अक्षय बिझी आहे. पण कितीही बिझी असला तरी चाहत्यांना अक्षय कसे बरे विसरेल? म्हणूनच ‘इट्स अ जॉली गुड मॉर्निंग हिअर इन मनाली जस्ट अराइव्हड अॅण्ड आॅलरेडी अफ्रेड आॅफ मिसींग इट व्हेन आय लिव्ह....’अशा कॅप्शनसह एका झक्कास सेल्फीच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना गुड मॉर्निंग केलेयं.