४ अंश डिग्रीत अक्की-इलियानाने केला ‘बीच सीन’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 11:02 IST
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि साऊथ ब्युटी इलियाना डिक्रुझ यांचा आगामी चित्रपट ‘रूस्तम’ १२ आॅगस्टला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे ...
४ अंश डिग्रीत अक्की-इलियानाने केला ‘बीच सीन’!
बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि साऊथ ब्युटी इलियाना डिक्रुझ यांचा आगामी चित्रपट ‘रूस्तम’ १२ आॅगस्टला रिलीज होणार आहे. चित्रपटाचे शूटींग हे फारच कठीण परिस्थितीत केल्याचे कळते आहे.सुत्रांच्या माहितीनुसार,‘ चित्रपटातील एक बीच सीन ४ अंश डिग्री तापमानात लंडनमध्ये शूट करण्यात आलेला आहे. इतर चित्रपटातील बीच सीन्स हे अत्यंत सावकाश आणि चांगल्या वातावरणात शूट केले जातात. यात मात्र ज्या बीचवर अक्षय-इलियाना यांचा रोमान्स चालू होता तेथील वाळू देखील प्रचंड थंड होती.