अजयने का निवडली अक्षयची वाट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 14:10 IST
बॉलिवूडचा प्रत्येक मोठा स्टार आजघडीला वर्षांतून दोन चित्रपट बनवतो. याला अपवाद म्हणजे अक्षय कुमार. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ वर्षाला एक-दोन नाही ...
अजयने का निवडली अक्षयची वाट?
बॉलिवूडचा प्रत्येक मोठा स्टार आजघडीला वर्षांतून दोन चित्रपट बनवतो. याला अपवाद म्हणजे अक्षय कुमार. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ वर्षाला एक-दोन नाही तर चार-चार चित्रपट करतो. मी माझ्या चाहत्यांसाठी वर्षाला चार चित्रपट घेऊन येईल, अशी घोषणा अक्षयने केली होती आणि तेव्हापासून आजपर्यंत अक्षयने आपल्या चाहत्यांना दिलेला हा शब्द पाळला आहे. पण आमच्याकडे बातमी आहे ती अक्षयची नाही तर अजय देवगणची. होय, अजय सुद्धा आता अक्षयच्याच मार्गावर पाऊल ठेवू पाहतो आहे.गत तीन वर्षांत अजयने ‘सिंघम रिटर्न्स’,‘अॅक्शन जॅक्शन’,‘दृश्यम’,‘शिवाय’ असे चार चित्रपट केले. पण आता अजयलाही अक्षयच्या मार्गावर चालत चाहत्यांसाठी अधिकाधिक चित्रपट बनवणे योग्य वाटू लागले आहे. त्यामुळे आता अजय अधिक मेहनत घेऊन वर्षभरात एकापेक्षा अधिक चित्रपट बनवून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. आता आपल्या आवडता स्टार्सचे अनेक रूप पाहायला मिळणार असतील तर कुठले चाहते आनंदी होणार नाहीत?अजयचा ‘शिवाय’ अलीकडेच रिलीज झाला. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट झाला नसला तरी अजयच्या चाहत्यांना मात्र तो कमालीचा आवडला. येत्या वर्षांत अजय ‘गोलमाल4’सह ‘बादशाहो’मध्ये दिस्णणार आहे. याशिवाय लवकरच अजय होम प्रॉडक्शनचा एक सिनेमाही घेऊन येतो आहे. यात अजयच्या अपोझिट त्याची पत्नी काजोल दिसणार असल्याची खबर आहे. एकंदर काय, तर अजयने ठरवलं म्हटल्यावर तो करणारच. या प्रयत्न व कष्टाचे त्याला किती फळ मिळते, तेच केवळ आपल्याला बघायचे आहे.