Join us

​अजयनेच दिली होती पैशांची आॅफर- केआरकेचा पलटवार !!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 18:13 IST

 अजय देवगणने करण जोहरवर केआरकेला २५ लाख रुपये 'शिवाय' चित्रपटावर नकारात्मक लिहिण्यासाठी दिल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली होती. ...

 अजय देवगणने करण जोहरवर केआरकेला २५ लाख रुपये 'शिवाय' चित्रपटावर नकारात्मक लिहिण्यासाठी दिल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी केली होती. यावरून निर्माण झालेल्या विवादामध्ये अडकलेल्या कमाल आर. खान अर्थात केआरकेने आता घुमजाव केला आहे. अजय देवगणनेच आपल्याला 'ये दिल है मुश्किल'चे नकारात्मक समिक्षण करण्यासाठी आॅफर दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे वादाला नवा रंग मिळाला आहे.केआरके आणि कुमार मंगत यांच्यातील संभाषण अजयने मीडियाकडे दिले आहे. या आडिओ क्लिपमध्ये केआरके २५ लाख रुपये करण जोहरने दिल्याचे मान्य करताना ऐकायला मिळतो. पण आता त्याने डाव अंगलट येतोय म्हटल्यावर पलटवार करीत घुमजाव केलेला दिसतो.केआरके म्हणतो, ‘करण जोहरने शिवायवर टीका करण्यासाठी मला कधी पैसे दिलेले नाहीत. मी कुमारला टरकवण्यासाठी २५ लाख बोललो होतो.’ दुसºया एका पोस्टमध्ये केआरके म्हणतो, ‘कुमार आणि अजय देवगणने मला 'ये दिल है मुश्किल'वर टीका करण्यासाठी पैशांची आॅफर दिली होती. टेपमध्येही त्याचा उल्लेख आहे. पण मी प्रस्ताव नाकारला. मी स्वतंत्रपणे समिक्षण करेन असे म्हटले होते.’पुन्हा एका ट्विटमध्ये केआरके म्हणतो, ‘लोक समजतात की मी कुमारला फोन केला होता पण तसे नाही तर त्यानेच मला फोन केला होता. ते माझे जवळचे मित्र आहेत. यापूर्वी आम्ही फोनवर बोललोय.’ }}}}करण जोहरने याबद्दल आपली प्रतिक्रिया दिलेली नाही. पण अजय देवगणने मात्र या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी केलीय.करण जोहर आणि अजयची पत्नी काजोल यांची चांगली मैत्री आहे. तिने अजयच्या आॅडिओला रि - ट्विट केले आहे आणि 'स्तब्ध' असल्याचे म्हटले आहे.करण आणि अजयचे चाहते मात्र एकमेकांवर आरोप करण्यात गुंतले आहेत.