अजय देवगणच्या बादशाहोसमोर आयुष्यमान खुराणा शुभ मंगल सावधान झाला फ्लॉप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 15:36 IST
गेल्या आठवड्यात चित्रपट प्रेमींसाठी मेजवानी ठरला होता. बॉक्स ऑफिसवर दोन वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. अजय देवगण ...
अजय देवगणच्या बादशाहोसमोर आयुष्यमान खुराणा शुभ मंगल सावधान झाला फ्लॉप
गेल्या आठवड्यात चित्रपट प्रेमींसाठी मेजवानी ठरला होता. बॉक्स ऑफिसवर दोन वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. अजय देवगण स्टारर बादशाहो आणि आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकरच्या जोडीचा शुभ मंगल सावधान रिलीज झाला होता. आयुष्यमान आणि भूमीच्या जोडीचा शुभ मंगल चित्रपट एका वेगळ्या थाटणीचा आहे. चित्रपटाचा सुरुवात चांगली आहे मात्र क्लाइमेक्सपर्यंत मात्र चित्रपट प्रेक्षकांना खेळवून ठेऊ शकला नाही. ALSO READ : It's Shocking : चित्रपटात येण्याआधी आयुष्यमान खुराणा ट्रेनमध्ये गाणं गाऊन पैस कमवायचाचित्रपट समीक्षक तरुण आदर्श यांच्या सोशल मीडियावरील ट्वीटनुसार शुक्रवारी या चित्रपटाने 2.71 कोटींची, शनिवारी 5.56 लाख आणि रविवारी 6.19 कोटींची कमाई केली. असे एकूण पहिल्या तीन दिवसात चित्रपटाने 14. 46 कोटींचा गल्ला जमावला. अजय देवगणच्या बादशाहोने तीन दिवसात 43.30 कोटींचा बिझनेस केला. दोनही चित्रपटांच्या बजेटबाबत बोलायचे झाले तर त्यात जमीन आसमानचा फरक आहे. शुभ मंगल सावधना 25 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे तर बादशाहो जवळपास 80 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. बादशाहोची बॉक्स ऑफिसवरील घोडदोड अजूनही कायम आहे. चौथ्या दिवसाची कमाई बघता चित्रपट 50 कोटींच्या घरात पोहोचला आहे. बादशाहो हा मल्टी स्टारर चित्रपट आहेत. यात अजय देवगणसह इलियाना डिक्रूझ, इशा गुप्ता, इम्रान हाश्मी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची कथा जयपूरची महाराणी गीतांजली (इलियाना डिक्रूझ)पासून सुरु होते. वडिलांच्या निधनानंतर गीतांजली देवी एकटीच राज्य कारभार सांभाळत असते. राज्याचा कारभार सांभाळण्यात तिची मदत भवानी सिंह (अजय देवगण) करतो. याच दरम्यान दोघांमध्यले प्रेम फुलायला लागते. देशात आणीबाणी लागू होते आणि राजे-महाराजांचा खजिना जप्त करण्याचे सत्र सुरु होते. ALSO READ : सलमान खानसोबत नाही तर आमीर खानसोबत काम करायचंय अजय देवगणला !